एक्स्प्लोर

अहमदपूरचे शिवलिंग शिवाचार्य महाराजांच्या संजीवन समाधीच्या अफवेने वादंग

अहमदपूरचे शिवलिंग शिवाचार्य महाराजांच्या संजीवन समाधीच्या अफवेने वादंग माजला असून भक्तीस्थळ ट्रस्टी आणि शिवा संघटनेचे प्रमुख यांनी परस्परांवर विरोधात पोलिसांत तक्रारी दिल्या आहेत.

लातूर : काल (शुक्रवार) सकाळपासून अहमदपुर येथील राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या भक्तिस्थळ या ठिकाणी जवळपास 10 हजार लोक जमले होते. त्या गर्दित एकच चर्चा सुरु होती ती महाराजांच्या संजीवन समाधिची. मात्र, पोलिसांनी वाढती गर्दी लक्षात घेवून ती फक्त अफवा होती हे जाहिर केले आणि महाराजच्या भक्तांनी सुटकेचा श्वास घेतला. या सर्व गोंधळत अहमदपूरकर महाराजांना भेटण्यासाठी अनेक महाराज आले होते. त्याचवेळी अहमदपूरकर महाराजांनी त्याच्या हाडोळती आणि अहमदपूर मठाचे उत्तराधिकारी नेमुन त्यांची नावे जाहिर केली. यात हाडोळती मठाचे उत्तराधिकारी राजकुमार स्वामी आणि अहमदपूर मठासाठी राजेश्वर स्वामी यांची नियुक्ति करण्यात आली आहे. माझी प्रकृती उत्तम आहे भक्तांनी स्वतःची काळजी घ्यावी, असे सांगत अहमदपूकर महाराज उपचारासाठी नांदेडला रवाना झाले. शिवा संघटना आणि ट्रस्ट यांच्या ऐकमेकांविरोधात तक्रारी हा सगळा घटनाक्रम होत असतानाच शिवा संघटनेचे प्रा. मनोहर धौंडे यांनी भक्तस्थळच्या ट्रस्ट वरील पदाधिकाऱ्यांवर आरोप केला आहे, की 50 कोटीच्या संपत्तीसाठी संजीवन समाधीची घाट घातला गेला. त्यांनी तशी तक्रारही दिली. मात्र, त्यांच्या आरोपाला प्रतिउत्तर देत ट्रस्टने तक्रार दिली आहे. जीवंत समाधीची अफवा पसरली अन् राज्यासह कर्नाटक, आंध्रप्रदेशमधून लोकांची अहमदपूरमध्ये तुफान गर्दी अहमदपूरकर महाराज हे अहमदपूर मठाचे सोळावे मठाधीश आहेत. हाडोळती, अहमदपूर येथील मठ तसेच अहमदपूर शहरा जवलील 14 एकर जागेत भक्तिस्थळ आहे. यावर ट्रस्टींना काहीही अधिकार नाही. आम्ही फक्त त्यांचा कार्यभार पाहत आहोत. अहमदपूरकर महाराजांनी आदेश केल्यामुळे आम्ही हे काम करतोय, यात आमचा कोणताही हेतु नाही. शिवा संघटनेचे धौंडे यात ट्रस्टीवर येण्यासाठी इच्छुक होते. यामुळे नको त्या वादाला त्यांनी तोंड फोडले आहे, असा आरोप ट्रस्टीचा आहे. या सर्व घटनेबाबत अहमदपूरकर महाराज काही दिवसात स्वतःची भूमिका स्पष्ट करतील. तोपर्यंत आरोपप्रत्यारोप सुरुच राहतील. डॉ. शिवसिंग शिवाचार्य महाराज यांचे अहमदपूर आणि हाडोलतीच्या मठांसाठी दोन उत्तराधिकारी जाहीर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Guillain-Barré Syndrome outbreak : कोल्हापूर, सांगलीनंतर आता सातारा आणि कराडमध्येही जीबीएसचा शिरकाव
कोल्हापूर, सांगलीनंतर आता सातारा आणि कराडमध्येही जीबीएसचा शिरकाव
Beed Crime: अजितदादांकडून छातीचा कोट करुन धनंजय मुंडेंचा बचाव, कदाचित त्यांना मीपणा करणारे आवडत असावेत: जितेंद्र आव्हाड
धनंजय मुंडे नशीबवान, एवढं होऊनही अजितदादा छातीचा कोट करुन उभे राहिले, जितेंद्र आव्हाडांची पोस्ट व्हायरल
Maharashtra Breaking News Live Updates: कर्जतचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या अडचणीत वाढ
Maharashtra Breaking News Live Updates: कर्जतचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या अडचणीत वाढ
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines 8AM 31 January 2024 सकाळी ८ च्या हेडलाईन्सAjit Pawar Beed : धनंजय मुंडेंच्या विरोधकांनाही अजितदादांचा धक्का, दादागिरीमुळे बीडला शिस्त लागेल?Chandrakant Patil Meet Uddhav Thackeray: ठाकरे आणि भाजपमधल्या जुन्या मित्रांना युती हवी?ABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines 7AM 31 January 2024 सकाळी ७ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Guillain-Barré Syndrome outbreak : कोल्हापूर, सांगलीनंतर आता सातारा आणि कराडमध्येही जीबीएसचा शिरकाव
कोल्हापूर, सांगलीनंतर आता सातारा आणि कराडमध्येही जीबीएसचा शिरकाव
Beed Crime: अजितदादांकडून छातीचा कोट करुन धनंजय मुंडेंचा बचाव, कदाचित त्यांना मीपणा करणारे आवडत असावेत: जितेंद्र आव्हाड
धनंजय मुंडे नशीबवान, एवढं होऊनही अजितदादा छातीचा कोट करुन उभे राहिले, जितेंद्र आव्हाडांची पोस्ट व्हायरल
Maharashtra Breaking News Live Updates: कर्जतचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या अडचणीत वाढ
Maharashtra Breaking News Live Updates: कर्जतचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या अडचणीत वाढ
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
IND vs ENG : भारत इंग्लंड पुण्यात आमने सामने येणार, टीम इंडियाकडे मालिका विजयाची संधी, एका कारणामुळं सूर्यकुमारचं टेन्शन वाढणार
भारताकडे मालिका विजयाची संधी, पुण्यातील जुन्या रेकॉर्डनं टेन्शन वाढवलं, टीम सूर्या कमाल करणार?
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
Beed Crime: माझ्याकडे 100 टिप्पर सोडा, साधा टायरही नाही, पोरीचं लग्न कर्ज काढून केलंय, भास्कर केंद्रे गुणरत्न सदावर्तेंना नेमकं काय म्हणाला?
माझ्याकडे 100 टिप्पर सोडा, साधा टायरही नाही, पोरीचं लग्न कर्ज काढून केलंय, भास्कर केंद्रे गुणरत्न सदावर्तेंना नेमकं काय म्हणाला?
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
Embed widget