डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांची भूमिका जाहीर, संपत्तीच्या वादावर पडदा
राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांनी प्रथम भूमिका जाहीर केली आहे.
लातूर : राष्ट्रसंत डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर हे संजीवन समाधी घेणार असल्याची चर्चा वाऱ्यासारखी पसरली होती. यामुळे अहमदपुरच्या भक्तिस्थळ भागात हजारो लोक जमा झाले होते, नंतर ही अफवा होती असे सांगण्यात आले. मात्र त्यानंतर अहमदपुर येथील मठाच्या 50 कोटी रूपयाच्या संपत्तीचा तो वाद होता अशी ही चर्चा समोर आली. विद्यमान ट्रस्टी आणि शिवा संघटनेत आरोपप्रत्यारोप होत राहिल होते. त्यावर शेवटी पडदा पडला आहे.
आज नांदेड येथे उपचार घेणारे राष्ट्रसंत डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांची भेट घेण्यासाठी शासकीय पथक गेले होते. त्यात लातुरचे जिल्हाधिकारी जी श्रीकांत ,नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ बिपिन इटनकर,नांदेडचे पोलिस अधीक्षक यांचा समावेश होता. ही संपूर्ण चर्चा इन कॅमेरा घेण्यात आली आहे. त्यात महाराजांनी स्पष्ठ केले आहे की, विद्यमान नूतन ट्रस्टी हे मी स्वत: नेमले आहेत. त्यांच्यावर आपला पूर्ण विश्वास आहे. अहमदपुर आणि हाडोळती येथील मठावर परवाच नेमलेले उत्तराधिकारी असतील. मुख्य बाब म्हणजे मठाच्या आणि ट्रस्ट च्या बाबतीत कोणत्याही पक्ष आणि संघटनेच्या हस्तक्षेप नको आहे.याच बरोबर ही सर्व माहिती राष्ट्रसंत डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांच्या भक्तिस्थळ या ठिकाणी बोर्डावर लावण्यात यावी. माझ्या समाधीची खोटी माहिती कोणी दिली आहे? मला माहित नाही त्याचा योग्य तो तपासा करावा.
राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यानी घेतलेल्या भूमिकेमुळे त्यांना मानणाऱ्या भक्त संप्रदायात त्याची काय मते आहेत ती पोहचली आहेत. यामुळे पुढील काळात कलह होणार नाहीत. सध्या राष्ट्रसंत डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांच्यावर नांदेड येथे उपाचार सुरु आहे. महाराजांची प्रकृती खालावली असली तरी सध्या ते उपचारांना साथ देत आहेत. अफवा पसरवणारे कोण आहेत याचा तपास पोलिस करत आहेत. ही सर्व माहिती या शासकीय पथकातील लातुरचे जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी दिली आहे.
संबंधित बातम्या :
अहमदपूरचे शिवलिंग शिवाचार्य महाराजांच्या संजीवन समाधीच्या अफवेने वादंग
जीवंत समाधीची अफवा पसरली अन् राज्यासह कर्नाटक, आंध्रप्रदेशमधून लोकांची अहमदपूरमध्ये तुफान गर्दी
डॉ. शिवसिंग शिवाचार्य महाराज यांचे अहमदपूर आणि हाडोलतीच्या मठांसाठी दोन उत्तराधिकारी जाहीर