एक्स्प्लोर
सचिन तेंडुलकर उद्या पुलंच्या घरी
मराठी साहित्य विश्वाशी क्रिकेट विश्वातील बादशाह सचिन तेंडुलकर यांचे स्नेहपूर्ण नाते आहे. उद्या सायंकाळी 6 वाजता भांडारकर रस्ता, येथील मालती माधव या पुलंच्या निवासस्थानी सचिन तेंडुलकरांचे आगमन होणार आहे.
पुणे : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर उद्या ( शुक्रवारी ) पु.ल. देशपांडे यांच्या निवासस्थानाला भेट देणार आहे. पुलंच्या जन्मशताब्दी वर्षात यंदाचा पुलोत्सव बहुरंगी होणार असून, त्यानिमित्त हा आगळावेगळा योग जुळून आला आहे.
मराठी साहित्य विश्वाशी क्रिकेट विश्वातील बादशाह सचिन तेंडुलकर यांचे स्नेहपूर्ण नाते आहे. उद्या सायंकाळी 6 वाजता भांडारकर रस्ता, येथील मालती माधव या पुलंच्या निवासस्थानी सचिन तेंडुलकरांचे आगमन होणार आहे.
पुलंच्या निवासस्थानी सायंकाळी 6.20 वाजता, सचिनच्या हस्ते 'आय लव्ह पुलं' (मी पुलं प्रेमी) या कार्यक्रमाच्या लोगोचे आणि पुलोत्सव पुणेच्या लोगोचे अनावरण करण्यात येणार आहे. त्यानंतर 6.30 वाजता तेंडुलकर परिवार आणि पुलं या संदर्भात सचिन तेंडुलकर पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
रायगड
भारत
नाशिक
Advertisement