एक्स्प्लोर
Advertisement
आता फक्त घसा बसलाय, उद्या कायमचेच घरी बसाल: सामना
मुंबई: 'आता फक्त घसाच बसलाय, उद्या कायमचेच घरी बसाल.' मुख्यमंत्र्यांवर अशी बोचरी टीका शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना'तून करण्यात आली आहे. गोरेगावमधल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवर खंडणीचे आरोप केले होते. त्यासह इतर सर्व मुद्द्यांबाबत सामनाच्या अग्रलेखातून मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडण्यात आलं आहे.
'शिवसेनेवर टीका करताना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा घसा बसला हे काही बरे झाले नाही. महानगरपालिका निवडणुकांत `भाजप’ बसेलच, पण त्याआधीच यांचे घसे बसू लागले.' असं म्हणत सामनातून मुख्यमंत्र्यांवर शरसंधान साधण्यात आलं आहे.
'निवडणुका जिंकण्यासाठी आम्हाला कलानी – भोसल्यांसारख्या गुंडापुंडांची, खंडणीखोरांची कवचकुंडले लागत नाहीत.' अशीही सामनातून भाजपवर टीका करण्यात आली आहे.
एक नजर सामनाच्या अग्रलेखावर:
आगीशी का खेळता?
* अयोध्येतील राममंदिराची घोषणा हे लोक 28 वर्षे करीत आहेत. समान नागरी कायद्याच्या बाबतीत गंडवागंडवी सुरूच आहे. मुंबईसह महाराष्ट्र यांना धनदांडग्यांच्या घशात घालायचाच आहे व त्यासाठी मुख्यमंत्री खंडोजी खोपडे व सूर्याजी पिसाळांच्या मदतीने शिवसेनेवर घाणेरडी टीका करणार असतील तर आज फक्त घसाच बसलाय, उद्या कायमचेच घरी बसाल. शिवसेना म्हणजे महाराठ्र अस्मितेचा पेटलेला अंगार आहे. आगीशी खेळू नका!
* शिवसेनेवर टीका करताना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा घसा बसला हे काही बरे झाले नाही. महानगरपालिका निवडणुकांत `भाजप’ बसेलच, पण त्याआधीच यांचे घसे बसू लागले. मुख्यमंत्र्यांनी आपल्या तब्येतीस सांभाळायला हवे. अखंड महाराठ्राची जबाबदारी जोपर्यंत त्यांच्यावर आहे तोपर्यंत त्यांना ती उत्तम प्रकारे सांभाळावीच लागेल. त्यांनी अधूनमधून हळद टाकून गरम दूध प्यावे. त्यामुळे घशाला शेक बसून थोडा आराम पडेल. गरम पाण्यात मध आणि लिंबू पिळून प्राशन केल्यासही त्यांच्या घशाला आराम पडू शकतो.
* भारतीय जनता पक्षाचे श्री. रामदेवबाबा यांच्या पतंजली ब्रॅण्डची काही औषधे बाजारात उपलब्ध आहेत. त्या औषधांचा बटवा त्यांनी जवळ बाळगावा हेच बरे. निवडणुकांत ज्यांची `नरडी’ जास्त गरमागरम होतात व टिकतात त्यांचे बरे चालते. त्यांना मुंबईसह दहा महानगरपालिका हद्दीत प्रचारासाठी घसा फोडायचा आहे. घसा फोडायचा म्हणजे शिवसेनेच्या नावाने शंख करायचा आहे. शिवसेना म्हणजे गुंडांचा पक्ष, खंडण्या घेणाऱयांचा पक्ष असा सूर लावताना त्यांचा घसा पुन्हा बिघडला तर कसे व्हायचे? म्हणूनच मुख्यमंत्र्यांनी जे पचेल तेच बोलावे.
* शिवसेना म्हणजे आगीचा लोळ आहे. टीका करणाऱयांची जीभ जाळून टाकेल. आम्ही शिवसेनेच्या माध्यमांतून मुंबईत जोरदार काम केले आहे. शिवसेनेचे काम हाच आमच्या विजयाचा मंत्र आहे. निवडणुका जिंकण्यासाठी आम्हाला कलानी– भोसल्यांसारख्या गुंडापुंडांची, खंडणीखोरांची कवचकुंडले लागत नाहीत. ज्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष टीव्ही कॅमेऱ्यांसमोर खंडणी घेताना पकडला गेला त्या पक्षाच्या लोकांनी शिवसेनेवर हे असले घाणेरडे आरोप करावेत हा विनोदच आहे.
* बलात्कार, खून, लफंगेगिरी, चोऱया व भ्रष्टाचार केल्याचे `दाखले’ दाखवा व पक्षात प्रवेश घेऊन पद मिळवा असे जे `पॅकेज’ भाजप मंडळींनी जाहीर केले आहे ते कोणत्या चारित्र्यात व साधनशूचितेत बसते? शिवसेना गुंड असेल तर मग बाबरीच्या लढय़ात राममंदिरासाठी जे कोठारी बंधू व शिवसेनेचे अनेक कारसेवक शहीद झाले ते सध्या फडणवीस यांच्या व्याख्येत गुंड व खंडणीखोरच म्हणायचे काय?
संबंधित बातम्या:
दोन्ही ठाकरे बंधू फार काळ वेगळे राहू शकत नाही: विखे-पाटील
नागपूर महापालिकेत मोठ्या घोटाळ्यांचा शिवसेनेचा आरोप
जास्त बोलणार नाही, घसा बसायचा, उद्धव ठाकरेंच्या कानपिचक्या
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
निवडणूक
नागपूर
Advertisement