Rohit Pawar : जनता साथ देत नाही म्हणून निधीची धमकी आचारसंहितेचा भंगच म्हणावा लागेल! रोहित पवारांचा अजितदादांवर हल्लाबोल
तुम्हाला आम्ही निधी देत आहोत. त्यामुळे ईव्हीएम मशीनची बटनं पटापट दाबा, तसं झालं नाही तर आम्हाला देखील हात आखडता घ्यावा लागेल, असा इशारावजा सल्ला अजित पवार यांनी दिला होता.
Rohit Pawar on Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अप्रत्यक्षरित्या निधीवरून इशारा दिल्यानंतर वादंग सुरू होण्याची चिन्हे आहेत. या संदर्भात शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आता अजित पवारांवर तोफ डागली आहे. अजित पवार यांनी इंदापूरमध्ये बोलताना आज तुम्हाला आम्ही निधी देत आहोत. त्यामुळे ईव्हीएम मशीनची बटनं पटापट दाबा, तसं झालं नाही तर आम्हाला देखील हात आखडता घ्यावा लागेल, असा इशारावजा सल्ला अजित पवार यांनी दिला होता.
दादा नेमके कोणत्या निधीबाबत बोलत आहेत?
आता या वक्तव्यावरून वाद रंगण्याची चिन्हे आहेत. आमदार रोहित पवार यांनी ट्विट करून अजित पवारांना विचारणा केली आहे. त्यांनी ट्विट करताना निवडणूक आयोगाला मेन्शन करत याची दखल घेण्यासाठी दखल घ्यावी, असे म्हटले आहे. रोहित पवार यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, अजितदादांनी सभेत भाषण करताना निधीबाबत वक्तव्य केल्याचं समोर आलं. दादा नेमके कोणत्या निधीबाबत बोलत आहेत? मलिदा गँगचे सदस्य असलेल्या त्यांच्या मित्रांकडे असलेल्या निधीबाबत की सरकारी विकास निधीबाबत? जनता साथ देत नाही म्हणून आता निधीची धमकी देणे हा आचार संहितेचा भंगच म्हणावा लागेल! निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घ्यावी!
अजितदादांनी सभेत भाषण करताना निधीबाबत वक्तव्य केल्याचं समोर आलं. दादा नेमके कोणत्या निधीबाबत बोलत आहेत? #मलिदा_गँगचे सदस्य असलेल्या त्यांच्या मित्रांकडे असलेल्या निधीबाबत की सरकारी विकास निधीबाबत? जनता साथ देत नाही म्हणून आता निधीची धमकी देणे हा आचार संहितेचा भंगच म्हणावा लागेल!… pic.twitter.com/q2y6WA583z
— Rohit Pawar (@RRPSpeaks) April 17, 2024
त्यामुळे आता अजित पवार यांच्या विरोधात शरद पवार गटाकडून आक्रमक भूमिका घेतली जाणार का? असाही प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या