एक्स्प्लोर

Rohit Pawar ED Inqury : आजोबांचा आशीर्वाद, ईडी कार्यालयाच्या दरवाजापर्यंत आत्याची सोबत; रोहित पवार चौकशीसाठी दाखल, आतापर्यंत काय-काय घडलं?

Rohit Pawar ED Inqury : शरद पवारांचे आशीर्वाद घेऊन आमदार रोहित पवार चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल, सुप्रिया सुळेंची ईडी कार्यालयाच्या दरवाजापर्यंत सोबत, आतापर्यंत काय-काय घडलं?

Rohit Pawar ED Inqury : मुंबई : बारामती अॅग्रो कथित घोटाळा प्रकरणी (Baramati Agro Scam Case) राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress Party) शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar)  यांना ईडीनं (ED) चौकशीसाठी समन्स बजावलेलं. रोहित पवार (Rohit Pawar) यांना आज म्हणजेच, 24 जानेवारीला चौकशीसाठी पाचारण करण्यात आलेलं. त्यानुसार आज रोहित पवार ईडी चौकशीसाठी हजर झालेत. साधारणतः सकाळी साडेदहा वाजता रोहित पवार ईडी कार्यालयात पोहोचले. चौकशीत पूर्ण सहकार्य करणार असल्याची प्रतिक्रिया रोहित पवारांनी यापूर्वीच दिली होती. तसेच, कार्यकर्त्यांनाही शांत राहण्याचा सल्ला रोहित पवारांनी दिला होता. तसेच, ईडी कार्यालयात दाखल होण्यापूर्वी मी मराठी माणूस आहे, पळून जाणार नाही, असं रोहित पवार म्हणाले. 

आमदार रोहित पवार यांची आज मुंबईत ईडी चौकशी सुरू आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस रोहित पवारांच्या समर्थनात पक्ष शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे. रोहित पवार ट्रायडन्ट हॉटेलवरुन निघाल्यापासून ईडी कार्यालयात दाखल होईपर्यंत त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते होते. चौकशीसाठी ईडीसमोर हजर होण्यापूर्वी सर्वात आधी रोहित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात पोहोचले आणि त्यांनी शरद पवारांचे आशीर्वाद घेतले. रोहित पवारांची चौकशी संपेपर्यंत शरद पवार (Sharad Pawar) दिवसभर मुंबईतील पक्षाच्या कार्यालयातच थांबणार आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) स्वतः रोहित पवार यांना ईडी कार्यालयापर्यंत सोडायला आलेल्या. दरम्यान, ईडी चौकशीत पूर्ण सहकार्य करणार असल्याची प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून रोहित पवारांच्या घरी ईडीची छापेमारी सुरू होती. पण त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं नव्हतं. तसेच, मी ज्याप्रकारे वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य करतोय, त्यामुळे माझ्यावर केंद्रीय यंत्रणांचा दबाब आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं रोहित पवारांकडून वारंवार सांगितलं जात होतं. अशातच 19 जानेवारी रोजी ईडीनं रोहित पवारांना समन्स धाडलं आणि 24 जानेवारी म्हणजेच, आज चौकशीसाठी हजर राहण्याचं सांगण्यात आलं. त्यानुसार, आज रोहित पवार चौकशीसाठी ईडीसमोर हजर झाले आहेत. 

रोहित पवार ईडी कार्यालयात दाखल होईपर्यंतचा घटनाक्रम

  • रोहित पवार मुंबईतील ट्रायडन्ट हॉटेलमध्ये वास्तव्याला होते
  • सकाळी ट्रायडन्ट हॉटेलवरुन ते निघाले
  • ट्रायडन्ट हॉटेलबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची गर्दी जमली होती 
  • ट्रायडन्टवरुन रोहित पवार थेट दक्षिण मुंबईतील पक्ष कार्यालयात पोहोचले. 
  • राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि सुप्रिया सुळे कार्यालयात आधीपासूनच उपस्थित होत्या
  • रोहित पवारांनी शरद पवारांचे आशीर्वाद घेतले आणि तिथून ते ईडी कार्यालयाच्या दिशेनं रवाना झाले 
  • सुप्रिया सुळे रोहित पवारांना ईडी कार्यालयात सोडण्यासाठी त्यांच्यासोबत गेल्या होत्या. 
  • पक्षकार्यालयाबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती, कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजीही करण्यात आली 
  • सुप्रिया सुळे रोहित पवार ईडी कार्यालयाबाहेर आले
  • ईडी कार्यालयाबाहेरही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची गर्दी होती, कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजीही करण्यात आली 
  • सुप्रिया सुळेंचे आशीर्वाद घेऊन, रोहित पवार ईडी चौकशीसाठी कार्यालयात निघून गेले

ईडी कार्यालयात घेऊन गेलेल्या फाईलवर महापुरुषांचे फोटो 

रोहित पवार आज ईडी चौकशीसाठी हजर झाले आहेत. रोहित पवार ईडी कार्यालयात जाताना स्वतःसोबत एक फाईल घेऊन गेले आहेत. त्या फाईलनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. रोहित पवारांनी आपल्यासोबत ईडी कार्यालयात जी फाईल नेली, त्या फाईलवर सर्व महापुरुषांचे, समाजसुधारकांचे फोटो लावले आहेत. त्या फाईलवर 'विचारांचा वारसा' असंही लिहिण्यात आलं आहे. 

बारामती अॅग्रो कथित घोटाळा प्रकरणी आरोप काय? 

कन्नड सहकारी साखर कारखान्याचा शिखर बँकेतर्फे लिलाव करण्यात आला. 50 कोटी रुपयांना बारामती ॲग्रोने या कारखान्याची खरेदी केली, असा आरोप आहे. लिलावातील सहभागी बारामती ॲग्रो, हायटेक इंजिनिअरिंग कॉर्पोरेशन इंडिया लि. आणि समृद्धी शुगर प्रा. लि. या कंपन्यांमध्ये एकमेकांत झालेले व्यवहार संशयास्पद असल्याचं बोललं जातं.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 13 January 2025Sanjay  Raut Meet Sharad Pawar | मिशन पालिका इलेक्शन! संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेटCity Sixty | सिटी 60 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP MajhaSantosh Deshmukh Case | धनंजय देशमुखांचं 'शोले' स्टाईल आंदोलन, सरकारला अल्टिमेटम Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
Embed widget