एक्स्प्लोर
दरवाजा उघडा ठेऊन झोपणं पडलं महागात, 30 हजारांचा ऐवज लंपास
![दरवाजा उघडा ठेऊन झोपणं पडलं महागात, 30 हजारांचा ऐवज लंपास Robbery In Shrigonda Three Robber Absconding Latest Update दरवाजा उघडा ठेऊन झोपणं पडलं महागात, 30 हजारांचा ऐवज लंपास](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/05/04083519/ahamadnagar-Robbery.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
अहमदनगर: उकाड्यापासून सुटका व्हावी यासाठी घराचा दरवाजा उघडा ठेवणं अहमदनगरमधील एका कुटुंबाला चांगलंच महागात पडलं आहे. मध्यरात्री घराच दार उघडं पाहताच श्रीगोंद्यातील लोणी व्यंकनाथ येथे तीन दरोडेखोरांनी थेट घरात घुसून 30 हजारांचा ऐवज लंपास केला.
उकाडा असह्य झाल्यानं शिंदे कुटुंबीय काल (बुधवार) मध्यरात्री दरवाजा उघडा ठेऊन झोपी गेलं. हीच संधी साधून तीन दरोडेखोरांनी त्यांच्या घरावर दरोडा घातला. दरोडेखोर घरात घुसताच महिलांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. यावेळी दरोडेखोरांनी या महिलांना बेदम मारहाण केली. या मारहणीत पार्वती शिंदे ही महिला गंभीर जखमी झाली. सध्या तिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे.
दरम्यान, यावेळी दरोडेखोरांनी घरातील महिलांच्या अंगावरील दागिन्यांसह 30 हजारांच्या ऐवजावर डल्ला मारला. या सर्व प्रकारानंतर परिसरात दहशतीचं वातावरण आहे. सध्या पोलीस या तीनही दरोडेखोरांचा कसून शोध घेत आहे.
दुसरीकडे अनेक ठिकाणी चोर, दरोडोखोर असल्याची चर्चा आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वत:च गस्त घालणं सुरु केलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)