एक्स्प्लोर
नाशिकमध्ये मुथूट फायनान्सवर सशस्त्र दरोडा; गोळीबारात ऑडिटरचा मृत्यू, लाखोंची लूट
सकाळी पावणे अकराच्या सुमारास उंटवाडी परिसरातील मुथूट फायनान्समध्ये गोळीबार झाला.

नाशिक : नाशिकच्या मुथूट फायनान्समध्ये दिवसाढवळ्या सशस्त्र दरोडा पडला. दरोडेखोरांनी गोळीबार करुन लाखो रुपयाचा ऐवज लूटल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून दोघे जखमी आहेत. संजू सॅम्युअल असं मृताचं नाव असून तो ऑडिटर होता. दरोडेखोरांच्या हल्ल्यात संजू सॅम्युअल यांच्या शरीरात 3 गोळ्या घुसल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर कैलास जैन आणि राजू देशपांडे अशी जखमींची नावं आहेत. सकाळी पावणे अकराच्या सुमारास उंटवाडी परिसरातील मुथूट फायनान्समध्ये गोळीबार झाला. रिव्हॉल्वरसह आलेल्या चार दरोडेखोरांनी गोळीबार करुन लूट केली. त्यांना जे कोणी अडवेल, त्यांच्यावर ते फायरिंग करत होते. यानंतर पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील स्वत: घटनास्थळी दाखल झाले. मात्र दिवसाढवळ्या वर्दळीच्या ठिकाणी गोळीबार झाल्याने परिसरात भीतीचं वातावरण आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
पुणे
निवडणूक





















