एक्स्प्लोर
निवृत्त लष्करी जवानाची नाशिकमध्ये गोळ्या झाडून आत्महत्या
संतोषकुमार लष्करी सेवेतून 2012 साली निवृत्त झाले होते. संतोषकुमार यांच्या नावावर असलेली 12-बोअर रायफलद्वारे त्यांनी गोळी झाडल्याचे स्पष्ट झाले.

नाशिक : वडनेर गावात राहणाऱ्या एका सेवानिवृत्त लष्करी जवानाने राहत्या घरी रात्रीच्या सुमारास रायफलने गोळी झाडून आत्महत्त्या केली. संतोषकुमार महेश्वर चौधरी असे या सेवानिवृत्त लष्करी जवानाचे नाव आहे. संतोषकुमार लष्करी सेवेतून 2012 साली निवृत्त झाले होते. संतोषकुमार यांच्या नावावर असलेली 12-बोअर रायफलद्वारे त्यांनी गोळी झाडल्याचे स्पष्ट झाले. या रायफलने त्यांनी राहत्या घराच्या अंगणात स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केली. दरम्यान, घटना घडली तेव्हा घरात कोणी नव्हते, अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. आत्महत्येपूर्वी संतोषकुमार यांनी चिठ्ठी लिहून, मृत्यूस कोणीही जबाबदार नसल्याचे आणि कुणाविषयीही तक्रार नसल्याचे नमूद केले आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण























