नगर अर्बन सहकारी बँकेवर रिझर्व्ह बँकेचे निर्बंध
नगर अर्बन बँकमध्ये तीन कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी भाजपचे माजी खासदार दिलीप गांधी यांच्यासह बँकेच्या तत्कालीन पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अहमदनगर : अहमदनगर येथील नगर अर्बन को-ऑप बँकेवर रिझर्व बँकेने निर्बंध लागू केले आहेत. आज तसे पत्र RBI ने प्रसारित केले आहे. अर्बन बँकेला RBI च्या परवानगी शिवाय कुठेही गुंतवणूक करता येणार नाहीय तसेच कोणत्याही मालमत्तेची विक्री किंवा खरेदी करता येणार नाही. याशिवाय खातेदारांना 10,000 पेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाहीय असे निर्बंध अर्बन बँकेवर लागू करण्यात आले आहे. त्यामुळे बँकेच्या अडचणीत वाढ झाली असून अहमदनगर जिल्ह्यात एकाच खळबळ उडाली आहे.
23 डिसेंबर 2020 रोजी अर्बन बँकमध्ये तीन कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी भाजपचे माजी खासदार दिलीप गांधी यांच्यासह बँकेच्या तत्कालीन पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. सोनेतरण कर्ज प्रकरणात हा भ्रष्टाचार झाला होता. 7 ऑक्टोबर 2017 ते 10 डिसेंबर 2020 या दरम्यान दिलीप गांधी व इतर बँकेच्या पदाधिकाऱ्यांनी संगनमताने , कट रचून बोगस कागदपत्रे बँकेत जमा केले आणि 3 कोटी रुपये काढून बँकेची फसवणूक केली असल्याचा आरोप फिर्यादीने केला होता.
त्यापूर्वी 30 मे 2020 रोजी अर्बन बँकेने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमांचे पालन न केल्याने 40 लाखांचा दंड करण्यात आला होता.अर्बन बँकेचे 31 मे 2018 पूर्वीचे जे लेखापरीक्षण करण्यात आले, त्या लेखापरीक्षणमध्ये बँकेचे उत्पन्न आणि दिलेल्या कर्जाची थकबाकी याबत असलेल्या नियमांचे पालन अर्बन बँकेने केलेले नसल्याचे समोर आले. त्यामुळे रिझर्व बँक ऑफ इंडिया च्या IRAC च्या तरतुदींचे पालन न केल्याने RBI ने हा दंड केला होता.
त्यापूर्वी 3 ऑगस्ट 2019 पासून बँकेवर प्रशासक नेमण्यात आले होते. RBI च्या एक पथकाने अचानक बँकेला भेट दिली आणि त्यानंतर तडकाफडकी प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली. सुभाषचंद्र मिश्रा यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. बँकेच्या काही कर्ज प्रकरणात अनियमितता असल्याचे संगण्यात आले असून बँकेचा NPA वाढला. त्यामुळे RBI च्या पथकाने अचानक अर्बन बँकेला भेट देऊन प्रशासकाची नियुक्ती केली होती.
दरम्यान 30 नोव्हेंबर रोजी अर्बन बँकेची निवडणूक झाली असून माजी खासदार दिलीप गांधी प्रेरित सहकार पॅनलचे सर्व उमेदवार विजयी झाले आणि बँकेत सत्ता आली. सध्या राजेंद्र अगरवाल हे बँकेचे चेअरमन आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या :