लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणं अवघड, पुढच्या बजेटआधी पैसे मिळावेत, रामदास आठवलेंचा टोला
. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणे अवघड जात आहे, सरकारनं दिलेल्या आश्वासनामुळं महिलांनी मतदान केल्याचे वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी केलं.

Ramdas Athawale on Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजना (Ladki Bahin Yojana) ही राज्य सरकारची महत्वकांशी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना महिन्यालवा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. मात्र, निवडणुकीपूर्वी महायुतीनं महिलांना 2100 रुपये देणार असल्याची घोषणा केली होती. याबाबत केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणे अवघड जात आहे, सरकारनं दिलेल्या आश्वासनामुळं महिलांनी मतदान केल्याचे आठवले म्हणाले. पुढच्या बजेटआधी लाडक्या बहिणींचे पैसे द्यावेत असे आठवले म्हणाले.
औरंगाजेबाची कबर हटवा या मागणीला आमचा पाठिंबा नाही
सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या झाली. दलितांकडे कमी लक्ष दिले जात असल्याचे आठवले म्हणाले. राज्य सरकारने खासगी क्षेत्रात आरक्षण देण्याचा निर्णय घ्यावा असेही ते म्हणाले. भाऊराव पाटील यांनी जसे कमवा आणि शिका योजना सुरु केली, तशीच योजना सुरू करुन 5 ते 10 हजार द्यावेत असे आठवले म्हणाले. औरंगजेबाच्या कबरीरुन देखील आठवलेंनी प्रतिक्रिया दिली. मुस्लिमांना सांगतो आपली औलाद औरंगजेबाची नाही. औरंगजेब चांगला प्रशासक म्हणणे चुकीचे असल्याचे आठवले म्हणाले. औरंगाजेब हरामखोर होता. आता विनाकारण हा विषय काढून नये, कबर हटवा या मागणीला आमचा पाठिंबा नाही असे आठवले म्हणाले. कबर हटवू नका मात्र संभाजी महाराजांचे स्मारक असावे.नागपूर येथे पूर्वनियोजन करून दंगल घडवली. दंगल करणाऱ्यांना कठोर कारवाई करावी असे आठवले म्हणाले. हिंदूंनी शांत राहावे. विनाकारण वाद निर्माण करु नका. सर्व देशातील मंदिरे हे बुद्धांची होती. मुस्लिम समाजाने आपले नाते औरंगजेबाशी जोडू नये असेही आठवले म्हणाले. छत्रपती संभाजी महाराजांनी जबरदस्त कर्तृत्व निर्माण केले आहे असेही आठवले म्हणाले.
बौद्ध मंदिरे आमच्या ताब्यात द्या
बौद्ध मंदिरे आमच्या ताब्यात द्या, मी स्वतः बौद्ध गया येथे जाणार आहे. सर्व धर्माचे ट्रस्टी असावेत. आताचे असणारे ट्रस्टी रद्द करा असेही आठवले म्हणाले. बौद्ध धर्माच्या ट्रस्टीमध्ये इतरांना घेऊ नये असे ते म्हणाले. नेत्यांनी वाद लावू नये. वाद झाले तर देशाच्या विकासाला गती मिळणार नाही. जातीय तेढ निर्माण करू नये. नेत्यांनी तसे बोलू नये. आमदार आणि मंत्र्यांनी शपथ घेतली असून त्याची जाण ठेवावी असेही आठवले म्हणाले. रायगडच्या पालकमंत्रीपदाचा वाद मिटवायचा असेल तर RPI ला मंत्री पद द्या असेही आठवले म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

