एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
धनगर आरक्षणासाठी सरकार कटिबद्ध, राम शिंदेंचं आश्वासन
सांगली : धनगर समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे, असं जलसंधारण मंत्री राम शिंदेंनी म्हटलं आहे. राज्यात मराठा समाजापाठोपाठ दलित, ओबीसींचेही विविध मागण्यांसाठी मोर्चे निघत आहेत. त्यात आता धनगर समाजाचीही भर पडली आहे.
धनगर समाजाला एसटी आरक्षण मिळावं अशी मागणी करत सांगलीतल्या आरेवाडीमध्ये बिरोबाच्या वनात दसरा मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी आरक्षण मिळवून देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं राम शिंदेंनी म्हटलं.
आघाडी सरकारनं आरक्षणाचं आश्वासन पाळलं नाही, त्यामुळे आज मोर्चे निघत असल्याचं म्हणत राम शिंदेंनी शरद पवारांवरही टीका केली. या कार्यक्रमाला जलसंपदामंत्री राम शिंदे आणि धनगर समाजाचे नेते हजर आहेत.
धनगर समाजाच्या आरक्षणासाठी मार्चच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी धनगर समाजाचे आराध्य दैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाला साकडं घालून जेजुरी गड ते विधानभवन अशी बाईक रॅली काढण्यात आली होती. तसेच यासाठी आझाद मैदानावरही आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरातून धनगर समाजातील बांधव उपस्थित झाले होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
आरोग्य
गडचिरोली
Advertisement