एक्स्प्लोर

Raju Shetti : व्याज माफ सवलतीत सहकारी बॅंकाचा समावेश करावा, राजू शेट्टींची नारायण राणेंकडे मागणी

सहकारी बॅंकाचा व्याज माफ सवलतीच्या घोषणेत समावेश करण्यात यावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टींनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडे केली आहे.

Raju Shetti : केंद्र सरकारकडून लॅाकडाऊनच्या काळात देशातील उद्योगधंद्याना व्याज माफ सवलतीची घोषणा करण्यात आली होती. सदर माफीमध्ये सहकारी बॅंकाचा समावेश करण्यात आला नव्हता. त्यामुळं अनेक उद्योजक आणि क्लस्टर  या सवलतीपासून वंचित राहिले आहेत. त्यांना विशेष पॅकेज देऊन व्याज सवलतीचा लाभ देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी केली आहे. याबाबत त्यांनी केंद्रीय सुक्ष्म व लघु उद्योग मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांची भेट घेऊन ही मागणी केली आहे.

माफीमध्ये सहकारी बॅंकाचा समावेश करावा

आर्थिक पत नसल्याच्या कारणांमुळं  राष्ट्रीयकृत बॅंकाकडून अर्थसहाय्य न मिळाल्यानं विशेष करुन महाराष्ट्र राज्यामध्ये सहकारी बॅंकाकडून कर्ज पुरवठा करुन अनेक तरुणांनी छोटे मोठे उद्योग उभे केले आहेत. लॅाकडाऊनच्या काळात नवे प्रकल्प उभे करत असताना परप्रांतीय कामगारांचा तुटवडा, वाढलेले स्टील व सिमेंटचे दर यामुळं प्रकल्पाची किंमत वाढली आहे. उद्योगांनी सहकारी बॅकेकडून अर्थसहाय्य घेतल्यानं त्यांना केंद्र सरकारच्या अनुदान अथवा व्याज सवलतीच्या योजनांचा लाभ देण्यात आलेला नाही. त्यामुळं या माफीमध्ये सहकारी बॅंकाचा समावेश करण्यात यावा अशी मागणी राजू शेट्टींनी केली आहे.

उद्योजकांवर व्याज सवलतीची टांगती तलवार 

दरम्यान, काही सहकारी बॅंकानी व्याजावरील व्याजाची होणारी रक्कम माफ केली आहे. मात्र ती रक्कम केंद्र सरकारकडून संबंधित सहकारी बॅंकाना न मिळाल्यानं उद्योजकांवर व्याज सवलतीची टांगती तलवार उभी राहिली आहे. यामुळं लॅाकडाऊनच्या काळात या उद्योजकांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला आहे. त्यामुळं केंद्र सरकरकडून खास बाब म्हणून  लॅाकडाऊनच्या काळातील व्याज सवलतीचे विशेष पॅकेज देण्याची मागणी करण्यात यावेळी करण्यात आली.

देशातील उद्योगधंद्याना व्याज माफ सवलतीची घोषणा करण्यात आली होती. मात्र, यामध्ये सहकारी बॅंकाचा समावेश करण्यात आला नव्हता. त्यामुळं या योजनेत सहकारी बँकांचा समावेश करण्याची मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे. यामुळं देशातील छोट्या मोठ्या उद्याजकांना दिलासा मिळणार आहे. त्यांच्यावरी भार कमी होणार आहे. त्यामुळं राजू शेट्टी यांनी नारायण राणे यांची दिल्लीत भेट घेऊन सहकारी बँकांचा व्याज माफ सवलतीत समावेश करण्याची मागणी केली आहे. त्यामुळं आता यावर नारायण राणे काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.  

महत्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut On Akshay Shinde News : अक्षय शिंदेंच्या एन्काऊंटरवरुन राऊतांचा एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोपVijay Wadettiwar On Eknath Shinde : आता भाजपला एकनाथ शिंदेंची  गरज संपली- विजय वडेट्टीवारABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 05 PM 20 January 2025Maharashtra Guardian Minister News : पालकमंत्रीपदावरुन शिवसेना-भाजपत धुसफूस? गोगावले, भुसेंच्या नाराजीनंतर शिंदेंचा फडणवीसांना फोन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
Kolkata Rape Case : कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
Jalgaon Crime : माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
Embed widget