एक्स्प्लोर
राज ठाकरे आजोबा प्रबोधनकार ठाकरेंच्या अमरावतीतील घरी
राज ठाकरे यांचे आजोबा अर्थात प्रबोधनकार ठाकरे आणि आजी हे 1926 ते 1932 या काळात अमरावती जिल्ह्यातील परतवाडामध्ये वास्तव्याला होते.
अमरावती : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपले आजोबा प्रबोधनकार ठाकरेंच्या अमरावतीतील घराला भेट दिली. विदर्भ दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरेंनी या निमित्ताने आठवणींना उजाळा दिला.
राज ठाकरे यांचे आजोबा अर्थात प्रबोधनकार ठाकरे आणि आजी हे 1926 ते 1932 या काळात अमरावती जिल्ह्यातील परतवाडामध्ये वास्तव्याला होते. आजी-आजोबा राहिलेल्या घराला भेट देऊन राज ठाकरेंनी आठवणी ताज्या केल्या.
ज्या घरात प्रबोधनकार ठाकरे राहत होते, ते घर आजही तसंच डौलाने उभं आहे. तत्कालीन घरमालकाच्या नातवाने राज ठाकरेंकडे या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांचं मोठ स्मारक व्हावं, अशी मागणी केली आणि राज ठाकरे यांनी ती लगेच मान्यही केली.
राज ठाकरे गेल्या चार दिवसांपासून अमरावती जिल्ह्यात आहेत. मेळघाटहून परत अमरावतीला जाताना त्यांनी परतवाडा येथील आपल्या आजी-आजोबांच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्यांच्यासोबत बाळा नांदगावकरही होते. राज ठाकरे आता यवतमाळच्या दौऱ्यावर जाणार आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
क्रिकेट
बॉलीवूड
महाराष्ट्र
Advertisement