एक्स्प्लोर
पालघरमध्ये पावसाचं थैमान, डहाणू 456 मिमी पाऊस
पालघर : पालघर जिल्ह्यात पावसाने अक्षरश: थैमान घातलं आहे. गेल्या 24 तासात एकट्या डहाणू भागात तब्बल 456 मिमी पाऊस झाला असून पालघरमध्ये 315 मिमी पाऊस कोसळला आहे.
तर पालघरच्याच बोईसरमध्येही पावसाने धुमाकूळ घातला आहे. बोईसरमध्ये 344 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. याशिवाय वसईतही 85 मिमी पाऊस झाला आहे.
पालघरच्या ग्रामीण भागात बोईसर एमआयडीसी, तसंच पेठेगाव, पूरगाव, बोईसर सिडको, तारापूर, आंबेडकर नगर इथल्या सखल भागात पाणी साचलं आहे.
पावसामुळे पालघरच्या रेल्वेवरही परिणाम झाला आहे. अंधेरी, विरार आणि डहाणू-चर्चगेट या लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement