एक्स्प्लोर

पावसाने झोडपलं, शेतीचं नुकसान; पाणी पातळी वाढल्यानं बोअरवेल ओव्हरफ्लो, बीड-हिंगोलीचा पाणी प्रश्न मिटणार?

Hingoli News Update : मराठवाड्यात यंदा परतीचा पाऊस जोरदार झालाय. यामुळे बीड आणि हिंगोलीमध्ये बोअरवेल ओव्हरफ्लो झाले आहेत.

Hingoli News Update : हिंगोली जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाल्याने जिल्ह्यातील अनेक छोटे मोठे तलाव भरले आहेत. त्याचबरोबर सिद्धेश्वर ईसापूर धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. सततच्या पावसामुळे जमिनीतील पाणी पातळी देखील वाढली आहे.  जिल्ह्यात आतापर्यंत 118 टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक ठिकाणचे बोरावेल ओसंडून वाहत आहेत. औंढा नागनाथ तालुक्यातील लाख येथील शेतकरी त्र्यंबकराव लोंढे यांच्या शेतातील बोरवेल देखील ओव्हरफ्लो झाला आहे. बोरवेलमधून पाणी ओसंडून वाहत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा भविष्यातील पाणी प्रश्न मिटला  आहे.  बीडमध्ये देखील बिना लाईटचे बोरवेल ओसांडून वाहत आहेत.  

बीडमध्ये बिना लाईटचे बोरवेल ओसांडून वाहू लागले
बीड जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसानं मोठं थैमान घातलं असून शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालय. तर दुसरीकडे माजलगाव तालुक्यामध्ये पाणी पातळी वाढल्याने अनेक गावातील बोरवेलमधून पाणी वाहताना दिसत आहे. गेल्या वर्षी देखील याच परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे बोअरमधील पाणी जमिनीवरून वाहताना पाहायला मिळालं होतं.  या वर्षी देखील आता परतीच्या पावसानं जमिनीतली पाणी पातळी वाढली असून बोरवेल्स ओसंडून वाहू लागले आहेत. 

बीड जिल्ह्यात सध्या पाऊस थांबला असला तरी बोरवेल्स ओसंडून वाहत असल्याने अनेक शेतामधलं पाणी अद्यापही बाहेर निघालेलं नाही. या पाण्याचा फायदा शेतकऱ्यांना भविष्यात होणार असला तरी सध्या मात्र शेतात असलेल्या पिकाचे नुकसानच होतय. 

मागच्या वर्षी मराठवाड्यात 42 बोअरवेल ओव्हरफ्लो 

मराठवाड्यामध्ये गेल्या वर्षी देखील मोठा पाऊस झाला होता. त्यामुळे मराठवाड्यात मागच्या वर्षी तब्बल 42 ओअरवेल ओव्हरफ्लो झाले होते.  उन्हाळ्यात बोरवेल कोरडेठाक असतात. त्याच बोरवेलचे पाणी बिना लाईट कनेक्शनचं ओसंडून वाहत होतं. यंदा देखील अनेक ठिकाणी अशी परिस्थिती आहे. 

शेतकऱ्यांचं मोठं नुकसान

दर वर्षी दुष्काळाने होरपळणाऱ्या मराठवाडा आणि विदर्भात यंदा परतीच्या पावसाने चांगलाच दुमाकूळ घातला. पाण्यासाठी धावाधाव करणाऱ्या शेतकऱ्यांचे मात्र या परतीच्य पावसाने मोठे नुकसान झाले आहे. काढणीला आलेली पिकं पावसाच्या पाण्यासोबत वाहून गेली आहेत. त्यामुळे ऐन दिवाळीत शेतकऱ्यावर आस्मानी संकट ओढावलं आहे. त्यामुळे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. राज्य सरकारने मदत जाहीर केली आहे. परंतु, अनेक शेतकऱ्यांना सरकारची ही मदत पोहोचली नाही. 

महत्वाच्या बातम्या

दोन महिन्यांचा संसार उद्धवस्त, विजेच्या खांबाला चिकटून महावितरण कर्मचाऱ्याचा मृत्यू  

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Election commission SIR: महाराष्ट्रातील SIR मोहीमेबाबत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, 'या' कारणासाठी बीएलओ घरी जाऊन कागदपत्रं जमा करणार
महाराष्ट्रातील SIR मोहीमेबाबत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, 'या' कारणासाठी बीएलओ घरी जाऊन कागदपत्रं जमा करणार
Bhandara Farmers: भातपिकांवर घातक किडींचा प्रादुर्भाव, बळीराजा दुबार संकटात; भंडाऱ्याच्या शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले, 'तातडीनं शेत बांधावर पोहोचा!'
भातपिकांवर घातक किडींचा प्रादुर्भाव, बळीराजा दुबार संकटात; भंडाऱ्याच्या शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले, 'तातडीनं शेत बांधावर पोहोचा!'
Maharashtra Live blog updates: डहाणू तालुक्यातील तलासरी, धुंदलवाडी मोडगाव भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं
Maharashtra Live blog updates: डहाणू तालुक्यातील तलासरी, धुंदलवाडी मोडगाव भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं
Shivsena UBT: राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचा 'शिवसेना मदत कक्ष'; अमरावतीतून खासदार अरविंद सावंत यांच्या हस्ते होणार शुभारंभ
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचा मदतीचा हात, तालुकास्तराव ‘शिवसेना शेतकरी मदत केंद्र’; अमरावतीत खासदार अरविंद सावंतांच्या हस्ते होणार शुभारंभ

व्हिडीओ

Gadchiroli Flood : छत्तीसगडचा पाऊस, गडचिरोलीत हाहाकार Special Report
Manoj Jarange Patil : व्यासपीठ काढलं, मंडप हटवला... पण आंदोलन सुरुच | Special Report ABP Majha
Manoj Jarange Pc : फडणवीस सरकारची डोकेदुखी वाढणार? रुग्णालयातून मनोज जरांगे काय म्हणाले?
Maharashtra Dushkal Jahir : राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर, 75 टक्के दुष्काळ जाहीर
Lalbaug Cha Raja Visarjan : लालबाग राजाच्या विसर्जनाला यंदाही विलंब होणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: डहाणू तालुक्यातील तलासरी, धुंदलवाडी मोडगाव भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं
Maharashtra Live blog updates: डहाणू तालुक्यातील तलासरी, धुंदलवाडी मोडगाव भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं
Analogue Paneer Ban : 'अ‍ॅनालॉग पनीर'वर FSSAI देशभरात का बंदी आणतंय? बनावट पनीर खाऊन आरोग्य कसं धोक्यात?
'अ‍ॅनालॉग पनीर'वर FSSAI देशभरात का बंदी आणतंय? बनावट पनीर खाऊन आरोग्य कसं धोक्यात?
सातारा जिल्हा बँक निवडणुकीसाठी खासदार उदयनराजे भोसले यांचा उमेदवारी अर्ज दाखल; 'बँकेत राजकारण नको' उदयनराजेंचा इशारा
बँकेत राजकारण नको..., सातारा जिल्हा बँक निवडणुकीसाठी उदयनराजे भोसले यांचा उमेदवारी अर्ज दाखल
Mumbai Accident : महिला कामावरून सुटल्यानंतर घरी निघाली मात्र वाटेत अनर्थ..., टँकरच्या धडकेत 32 वर्षांच्या महिलेचा मृत्यू
महिला कामावरून सुटल्यानंतर घरी निघाली मात्र वाटेत अनर्थ..., टँकरच्या धडकेत 32 वर्षांच्या महिलेचा मृत्यू
Drought : आर्थिक मदतीसाठी पुन्हा 'स्वतंत्र जी.आर.' काढू असे सांगून सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली : अनिल देशमुख
सरकारनं दुष्काळ जाहीर केला मात्र शेतकऱ्यांना प्रत्यक्ष आर्थिक मदत कधी मिळणार याचे स्पष्ट उत्तर दिले नाही : अनिल देशमुख
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणच्या ऑगस्टच्या हप्त्यासाठी सामाजिक न्याय विभागाकडून 339 कोटी वितरीत, ऑगस्टचे 1500 रुपये कधी मिळणार?
लाडक्या बहिणींना ऑगस्टच्या 1500 रुपयांची प्रतीक्षा, सामाजिक न्याय विभागाकडून महत्त्वाचा शासन निर्णय जारी 
Ahilyanagar : 'मातोश्री' वृद्धाश्रमात रक्ताचा सडा! हात थरथरण्यावरून चिडवले म्हणून वृद्धाने लोखंडी रॉडने दोन सहकाऱ्यांना संपवले
'मातोश्री' वृद्धाश्रमात रक्ताचा सडा! हात थरथरण्यावरून चिडवले म्हणून वृद्धाने लोखंडी रॉडने दोन सहकाऱ्यांना संपवले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2026 | शनिवार
Embed widget