एक्स्प्लोर

दोन महिन्यांचा संसार उद्धवस्त, विजेच्या खांबाला चिकटून महावितरण कर्मचाऱ्याचा मृत्यू 

Beed News Update : विजेच्या खांबाला चिकटून महावितरण कर्मचाऱ्याचा मृत्यू झालाय. बीडमधील अंबेजोगाई येथे ही दुर्देवी घटना झाली आहे.

बीड : सर्वत्र दिवाळीचा आनंद साजरा केला जात असताना अंबाजोगाई तालुक्यातील वरवटी गावावर मात्र शोककळा पसरली आहे. महावितरणमध्ये कार्यरत असणाऱ्या वरवटी येथील तरुणाचा मृत्यू झालाय. लाईनमन मेघराज व्यंकटी चाटे (वय, २८) असं मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. कर्तव्य बजावत असताना विद्युत तारेला चिकटून त्यांचा मृत्यू झाला. 

दिवाळीत  विद्युत पुरवठा खंडित होऊ नये यासाठी दिवाळी असूनही महावितरणचे कर्मचारी परिश्रम घेत आहेत. कुठे बिघाड झाला तरी शक्य तेवढ्या कमी वेळात विद्युत पुरवठा सुरळीत करून दिला जात आहे. रविवारी दुपारी आंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील तलावाशेजारी असलेल्या क्रांतीनगर फिडरमध्ये बिघाड झाला होता. दुरुस्तीसाठी मेघराज चाटे हा तरुण लाईनमन विद्युत खांबावर चढला होता. त्यापूर्वी बंद केलेला विद्युत पुरवठा अचानक सुरु झाल्याने मेघराज यास विजेचा जोरदार झटका बसला.  त्यानंतर विद्युत पुरवठा खंडित करून मेघराज यांना खाली उतरवून तातडीने स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी तपासून मेघराज यास मयत घोषित केले.  

दोन महिन्यांचा संसार उद्धवस्त 

ऐन दिवाळीत चाटे कुटुंबियांच्या घरातील दिवा विझला आहे. विशेष म्हणजे दोन महिन्यापूर्वीच मेघराज चाटे यांचा विवाह झाला होता. त्यांच्या मृत्यूने अवघ्या दोन महिन्यांचा त्यांचा संसार उद्धवस्त झाला आहे. मेघराज  यांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

महिन्यात दुसरी घटना

दरम्यान, मागच्या महिन्यात देखील बीडमध्ये महावितरणच्या गलथान कारभारामुळे एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली होती.  बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील भेंडटाकळी तांडा येथे विजेच्या तारेला चिटकून आईसह दोन लेकरांचा मृत्यू झाल्याची हदयद्रावक घटना घडली होती.

गेवराई तालुक्यातील राठोड वस्तीवरील दोन लहान मुले शेतात खेळत होती. यावेळी शेतात पडलेल्या विद्युत तारेचा शॉक लागला.  त्यामुळे ही दोन्ही मुले खाली पडली. हे पाहता त्यांनी आई त्यांना वाचवण्यासाठी आईने धाव घेतली. परंतु, आईला देखील शॉक लागला आणि  या घटनेत तिघांचा दुदैर्वी मृत्यू झाला.  

महत्वाच्या बातम्या

'तुम्ही फक्त बोलता, आम्ही करून दाखवतो' मंत्री दीपक केसरकरांची उद्धव ठाकरेंवर थेट टीका 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन
पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
Ladki Bahin Yojna Court Case : मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahakumbh 2025: IIT Bombay चा एरोस्पेस इंजिनिअरकसा बनला साधू? UNCUT कहाणीManjili karad PC : मी मराठा असल्याने जरांगेंनी मला न्याय द्यावा; वाल्मिक कराडच्या पत्नीचं आवाहनWalmik Karad Custody : वाल्मिकला 7 दिवसांची पोलीस कोठडी, वकिलासह समर्थकांचा राडा | VIDEOPM Modi Speech ISKON Temple Navi Mumbai भारताला समजून घेण्यासाठी अध्यात्म समजून घेणं महत्वाचं : मोदी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन
पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
Ladki Bahin Yojna Court Case : मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
Manoj Jarange : अजित दादा धनंजय मुंडे टोळ्या चालवणारा, उघडा पडला; उपमुख्यमंत्र्यांचं थेट नाव घेत मनोज जरांगेंचा इशारा
अजित दादा धनंजय मुंडे टोळ्या चालवणारा, उघडा पडला; उपमुख्यमंत्र्यांचं थेट नाव घेत मनोज जरांगेंचा इशारा
PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
मोठी बातमी ! कोर्टात SIT चे 7 खळबळजनक दावे; खंडणीला अडथळा ठरल्याने संतोष देशमुखांचा खून, वाल्मिक कराड गोत्यात?
मोठी बातमी ! कोर्टात SIT चे 7 खळबळजनक दावे; खंडणीला अडथळा ठरल्याने संतोष देशमुखांचा खून, वाल्मिक कराड गोत्यात?
Walmik Karad : गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
Embed widget