एक्स्प्लोर

Police Recruitment Exam: बीडमध्ये पोलीस पाटील परीक्षेत चुकीच्या प्रश्नपत्रिकेमुळे गोंधळ, फेरपरीक्षेची मागणी

उमेदवारांच्या म्हणण्यानुसार, वेळ वाया गेल्यामुळे त्यांच्या कामगिरीवर थेट परिणाम झाला असून हा अन्याय दूर करणे आवश्यक आहे.

Police Recruitment Exam: बीड जिल्ह्यात 22 फेब्रुवारी रोजी पोलीस पाटील भरतीची लेखी परीक्षा पार पडली; मात्र परीक्षेदरम्यान काही उमेदवारांना चुकीच्या संचाची प्रश्नपत्रिका देण्यात आल्याचा प्रकार समोर आल्याने गोंधळ निर्माण झाला. प्रशासनाच्या लक्षात ही बाब आल्यानंतर संबंधित प्रश्नपत्रिका बदलण्यात आली, पण तोपर्यंत उमेदवारांचा बराच वेळ निघून गेला होता. त्यामुळे प्रशासनाच्या चुकीची शिक्षा उमेदवारांना भोगावी लागत असल्याची तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. परीक्षा पुन्हा घेण्यात यावी अशी मागणीही करण्यात येत आहे.

नेमके प्रकरण काय?

बीड जिल्ह्यात 22 फेब्रुवारी रोजी पोलीस पाटील भरतीची लेखी परीक्षा पार पडली. परंतु याच परीक्षेत काही उमेदवारांना चुकीच्या संचाची प्रश्नपत्रिका देण्यात आली. ही बाब तेथील प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर प्रश्नपत्रिका बदलण्यात आली. मात्र तोपर्यंत पेपर सोडविण्याचा बराच वेळ निघून गेला होता. त्यामुळे प्रशासनाच्या चुकीची शिक्षा उमेदवारांना भोगण्याची वेळ आली.

या संदर्भात सुकन्या राठोड या महिला उमेदवाराने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन ही बाब अधिकृतरीत्या मांडली आहे. ज्या उमेदवारांना चुकीच्या संचाची प्रश्नपत्रिका देण्यात आली, त्यांच्या परीक्षा पुन्हा घेण्यात याव्यात, अशी स्पष्ट मागणी करण्यात येत आहे. उमेदवारांच्या म्हणण्यानुसार, वेळ वाया गेल्यामुळे त्यांच्या कामगिरीवर थेट परिणाम झाला असून हा अन्याय दूर करणे आवश्यक आहे.

प्रश्नपत्रिकाचा गोंधळ,फेरपरीक्षेची मागणी

जिल्ह्यातील पोलीस पाटील पदासाठी एकूण 11 हजार 325 जागांसाठी परीक्षा घेण्यात आली होती, तर 10 हजार 886 उमेदवार परीक्षेला उपस्थित होते. अंबाजोगाई येथील परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिकेबाबतचा हा गोंधळ उघडकीस आला. प्रश्नपत्रिका बदलण्यात आली असली तरी उमेदवारांचा मौल्यवान वेळ गेला असल्याने त्यांना नुकसान सहन करावे लागल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे.

दरम्यान, संबंधित उमेदवारांची फेरपरीक्षा घ्यावी आणि 2 मार्च रोजी जाहीर होणारा अंतिम निकाल स्थगित ठेवावा, अशी मागणी उमेदवारांकडून केली जात आहे. प्रशासनाच्या चुकीची शिक्षा उमेदवारांना का भोगावी, असा सवालही उपस्थित केला जात आहे. आता या प्रकरणावर प्रशासन काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Bajrang Sonawane : माझ्या मुलाचा हात असेल तर स्वतः पोलीस ठाण्यात घेऊन येतो; खा. बजरंग सोनवणेंची भूमिका, पोलीस महासंचालकांच्या निर्णयावर शंका
माझ्या मुलाचा हात असेल तर स्वतः पोलीस ठाण्यात घेऊन येतो; खा. बजरंग सोनवणेंची भूमिका, पोलीस महासंचालकांच्या निर्णयावर शंका
Bajrang Sonwane on Vilas Ghule Case: विलास घुले प्रकरणात मुलाचं नाव, बजरंग सोनवणेंचा विरोधकांना थेट इशारा, म्हणाले, 'ब्लॅकमेलिंग चालू आहे पण आता मी...'
विलास घुले प्रकरणात मुलाचं नाव, बजरंग सोनवणेंचा विरोधकांना थेट इशारा, म्हणाले, 'ब्लॅकमेलिंग चालू आहे पण आता मी...'
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC BEST Depot Redevelopment: मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
CM Devendra Fadnavis Maharashtra Government: मोठी बातमी: मुख्यमंत्र्यांना कोणत्याही मंत्र्याचा निर्णय फिरवण्याचा अधिकार, राज्य सरकारकडून नियमात महत्त्वाचा बदल
मोठी बातमी: मुख्यमंत्र्यांना कोणत्याही मंत्र्याचा निर्णय फिरवण्याचा अधिकार, राज्य सरकारकडून नियमात महत्त्वाचा बदल
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Embed widget