एक्स्प्लोर
एक्सप्रेस वेवर स्टेअरिंगवरच हार्ट अटॅक, हॅण्डब्रेक दाबून जीव सोडला
मुंबईहून पुण्याकडे जाताना तानाजी खाडे कार चालवत होते. परंतु घाट परिसरात अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी कार रस्त्याच्या बाजूला लावली.

रायगड : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पुण्याकडे जाताना एका कार चालकाला स्टेअरिंगवरच हृदयविकाराचा झटका आला. मात्र प्रसंगावधान दाखवून त्यांनी कार रस्त्याच्या बाजूला घेतल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र चालकचा दुर्दैवी मृत्यू झाला. तानाजी खाडे असं चालकाचं नाव असून ते 45 वर्षांचे होते. ते मुंबईतील चुनाभट्टी परिसरात राहत होते. मुंबईहून पुण्याकडे जाताना तानाजी खाडे कार चालवत होते. परंतु घाट परिसरात अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी कार रस्त्याच्या बाजूला लावली. चढणावरुन गाडी मागे येऊ नये म्हणून हॅण्डब्रेक लावल्याने मोठी दुर्घटना टळली. पुढील काही क्षणातच त्यांनी प्राण सोडले.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण
राजकारण























