श्रीवर्धनमध्ये भीषण अपघात! पुण्यातील पर्यटकांच्या थारने एकाला चिरडले, तरुणाचा जागीच मृत्यू, 4 जणांना अटक
रायगडच्या (Raigad) श्रीवर्धनमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. पुण्यातील पर्यटकांच्या थारने एकाला चिरडले आहे. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.
Raigad Accident : रायगडच्या (Raigad) श्रीवर्धनमध्ये भीषण अपघात (Accident) झाल्याची घटना घडली आहे. पुण्यातील पर्यटकांच्या थारने एकाला चिरडले आहे. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. परवेज हमदुले असं मृत व्यक्तीचे नाव आहे. पुण्यावरुन श्रीवर्धनमध्ये फिरण्यासाठी आलेल्या पुण्यातील पर्यटकांच्या वाहनांनी दोन मोटार सायकलींना जोरदार धडक दिली. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला आहे.
4 जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन बाजार पेठेत धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात एक तरुण जागीच ठार झाला आहे. अपघातग्रस्त थार आणि थार मधील 4 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. श्रीवर्धन पोलिस ठाण्यात आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, हा अपघात नेमका कसा झाला? याबाबतची माहिती अद्याप मिळालेली नाही. पर्यटक पुण्याहून श्रीवर्धनमध्ये फिरण्यासाठी आले होते. यावेळी हा भीषण अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे.
खंडाळा बोरघाटात मालवाहू ट्रकचा भीषण अपघात, चालकाचा जागीच मृत्यू
पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या भरधाव मालवाहू ट्रकचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने खंडाळा बोरघाटातील अमृतांजन ब्रिजला ट्रकची जोरदार धडक बसली. या भीषण अपघातात ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. मुंबई पुणे यशवंतराव चव्हाण एक्सप्रेस वे वर हा भीषण अपघात झाला आहे. सदर ट्रक पुण्याहून मुंबईकडे सिमेंटचे बॉक्स घेऊन निघाला होता. या अपघातानंतर मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच खंडाळा बोरघाट पोलीस घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. मात्र, या भीषण अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर ट्रकमधील सिमेंटचे बॉक्स रस्त्यावर पडल्याचं पाहायला मिळाले.
महत्वाच्या बातम्या:
खंडाळा बोरघाटात मालवाहू ट्रकचा भीषण अपघात, अमृतांजन ब्रिजला जोरदार धडक, चालकाचा जागीच मृत्यू























