खंडाळा बोरघाटात मालवाहू ट्रकचा भीषण अपघात, अमृतांजन ब्रिजला जोरदार धडक, चालकाचा जागीच मृत्यू
पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या भरधाव मालवाहू ट्रकचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे.
Pune Accident : पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या भरधाव मालवाहू ट्रकचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने खंडाळा बोरघाटातील अमृतांजन ब्रिजला ट्रकची जोरदार धडक बसली. या भीषण अपघातात ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. मुंबई पुणे यशवंतराव चव्हाण एक्सप्रेस वे वर हा भीषण अपघात झाला आहे.
या अपघातानंतर मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती
सदर ट्रक पुण्याहून मुंबईकडे सिमेंटचे बॉक्स घेऊन निघाला होता. या अपघातानंतर मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच खंडाळा बोरघाट पोलीस घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. मात्र, या भीषण अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर ट्रकमधील सिमेंटचे बॉक्स रस्त्यावर पडल्याचं पाहायला मिळाले. दरम्यान, ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने खंडाळा बोरघाटातील अमृतांजन ब्रिजला ट्रकची जोरदार धडक बसल्याची माहिती मिळाली आहे. सदरची मालवाहून ट्रक ही भरधाव वेगाने होती अशी देखील माहिती मिळाली आहे. या अपघातानंतर काही वेळ वाहतूक देखील विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र, घटनेनंतर पोलीस लगेच घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरु केले होते.
अपघातांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे
अपघाताच्या घटना सातत्याने वाढत आहेत. अनेक ठिकाणी या अपघातात मृत्यू होण्याचे प्रमाण देखील वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कालच बीड - लातूर राष्ट्रीय महामार्गावर अंबाजोगाईजवळ बीड आणि लातूर जिल्ह्याच्या सीमेवर स्विफ्ट डिझायर आणि स्कॉर्पिओ यांच्यात समोरासमोर भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत स्विफ्ट डिझायरमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला होता. तर स्कॉर्पिओमधील दोन महिलांसह चार जण गंभीर जखमी झाले होते. लातूर जिल्ह्यातील सायगाव येथे सुरू असलेल्या उरूसासाठी जात असताना भरधाव वेगातील स्विफ्ट डिझायरचा ताबा सुटून ती रस्त्याच्या दुभाजकावरून विरुद्ध दिशेने येणाऱ्या स्कॉर्पिओवर आदळली. अपघातानंतर स्थानिक व पोलिसांनी मदतकार्य करत जखमींना उपचारासाठी लातूर येथील रुग्णालयात दाखल केले होते. मृत जखमींची ओळख पटवण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
Accident News: कारचा स्पीड 140, नियंत्रण सुटलं अन् ट्रकच्या मागच्या बाजूस घुसली, वाहनाचा चेंदामेंदा; दोन जिवलग मित्रांचा जागीच दुर्दैवी अंत
























