एक्स्प्लोर
मसाज पार्लरवर धाड, वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश

कोल्हापूर : मसाज पार्लरच्या नावाखाली चालवल्या जाणाऱ्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश कोल्हापूर पोलिसांनी केला.
शहरातील गजबजलेल्या दाभोळकर कॉर्नर येथील रॉयल प्लाझामधील ‘अयोध्या स्पा अँड ब्युटीकेअर’मध्ये हा वेश्या व्यवसाय सुरु होता. पोलिसांनी सोमवारी रात्री धडक कारवाई केली.
यावेळी पोलिसांनी अड्ड्याची मालकीण, एजंटासह तिघांना जेरबंद केलं. वेश्या अड्ड्यातून दोन पीडित तरुणींचीही सुटका करण्यात आली.
गेल्या काही महिन्यांपासून दाभोळकर कॉर्नर परिसरात मसाज पार्लर चालविण्यात येत होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून इथे वेश्या व्यवसाय सुरु असल्याची कुणकुण पोलिसांना लागली.
पोलिसांनी रविवारी रात्री परिसराची पाहणी करून खात्री करून घेतली. मसाजच्या नावाखाली उघडपणे वेश्या अड्डा चालविला जात असल्याचे निदर्शनास आले.
स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक दिनकर मोहिते, विशेष पथकाच्या सहायक निरीक्षक वैष्णवी पाटील यांनी सोमवारी रात्री अड्ड्यावर छापा टाकून संशयितांना ताब्यात घेतले.
वेश्या व्यवसायासाठी आलेल्या दोन तरुणींनाही पथकाने चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीअंती प्रियांका यादव ही अड्ड्याची मालकीण, तर गणेश माने हा एजंट असल्याचे निष्पन्न झाले. तर एका गिऱ्हाईकालाही अटक करण्यात आली.
संशयितांविरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
रायगड
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
