Rahul Narvekar : भाजपकडून राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदाचे उमेदवार
Rahul Narvekar : विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपकडून राहुल नार्वेकर यांच्या नावावार शिक्कामोर्तब झालेय.
Rahul Narvekar : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. दोन आठवड्यांपासून सुरु असलेल्या राज्यातील सत्तानाट्याला पूर्णविराम लागला. आता मंत्रिमंडळ विस्तार आणि विधानसभा अध्यांक्षाच्या निवडीची प्रक्रिया सुरु झाली आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपकडून राहुल नार्वेकर यांच्या नावावार शिक्कामोर्तब झालेय. त्यांनी उमेदवारी अर्जही दाखल केला आहे. एकनाथ शिंदे गट आणि भाजपचं संख्याबळ पाहाता राहुल नार्वेकर पुढील विधानसभा अध्यक्ष होणार, यावर जवळपास शिक्कामोर्तब झालेय.
राहुल नार्वेकर हे 45 वर्षांचे असून अध्यक्षपदी निवड झाल्यास ते विधानसभेचे आजवरचे सर्वात तरूण अध्यक्ष असतील. राहुल नार्वेकर हे एकेकाळचे शिवसेनेचेच खंदे नेते होते. त्यानंतर ते राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेत होते. आता ते भाजपाचे आमदार आहेत. राहुल नार्वेकर यांना भाजपाने विधानसभा अध्यक्ष पदाचे उमेदवार जाहीर करत आणखी एक मास्टरस्ट्रोक खेळला आहे. राहुल नार्वेकर हे मुंबईतील कुलाबा मतदार संघाचे आमदार आहेत. दरम्यान, राहुल नार्वेकर यांचे सासरे रामराजे नाईक निंबाळकर हे सध्या विधान परिषदेचे सभापती आहेत. सासरे आणि जावई यांची जोडी महाराष्ट्राच्या विधी मंडळावर पाहायाला मिळू शकते.
महाराष्ट्र विधानसभेचं अधिवेशन एक दिवसानं पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आहे. शनिवारी आणि रविवारी म्हणजे 2 आणि 3 जुलैला होणारे अधिवेशन पुढे ढकलण्यात आलं आहे. हे अधिवेशन आता 3 आणि 4 जुलै म्हणजे येत्या रविवार आणि सोमवारी होणार आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नव नियुक्त सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी हे अधिवेशन बोलावलं आहे. याच अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची देखील निवड केली जाणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Maharashtra Government formation : ते पुन्हा आले, पण उपमुख्यमंत्री म्हणून; मोदी, शहांच्या आग्रहानंतर देवेंद्र फडणवीसांचा शपथविधी
maharashtra government formation : बेसावध राहू नका! राज ठाकरेंकडून एकनाथ शिंदे यांना सल्लावजा शुभेच्छा
...त्या दिवसापासून त्याचा ऱ्हासाकडे प्रवास सुरु होतो; राज ठाकरेंचा नाव न घेता उद्धव ठाकरेंवर निशाणा