...म्हणून आधी जाहीर केलेलं अधिवेशन एक दिवस पुढं ढकललं; काँग्रेसचा भाजपवर गंभीर आरोप
Maharashtra Assembly Session : नवनियुक्त सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी हे अधिवेशन बोलावलं आहे. मात्र या अधिवेशनाची तारीख आता बदलण्यात आली आहे. यावरुन काँग्रेसनं भाजपवर टीका केलीय.

Maharashtra Assembly Session : राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शिवसेनेचे (Shiv Sena) बंडखोर नेते (Rebel Leader) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शपथ घेतली. तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नवनियुक्त सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी हे अधिवेशन बोलावलं आहे. मात्र या अधिवेशनाची तारीख आता बदलण्यात आली आहे. हे अधिवेशन 2 आणि 3 जुलै रोजी होणार होते ते आता 3 आणि 4 जुलै रोजी होणार आहे.यावरुन काँग्रेसनं भाजपवर निशाणा साधला आहे.
काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन जे 2 आणि 3 जुलै रोजी होणार होते. ते केवळ हैदराबाद येथे भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीच्या निमित्ताने पुढे ढकलण्यात आले आहे. भाजपने स्वतःला सर्वशक्तिमान आणि संविधानापेक्षा अधिक शक्तिशाली समजण्यास सुरुवात केल्याचे हे लक्षण आहे, असं देखील सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.
So already announced Maharashtra Assembly session which was to be held on 2nd & 3rd July has been postponed just because it coincides with BJP national executive meeting in Hyderabad.
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) July 1, 2022
It's a sign that BJP has started considering itself omnipotent - more powerful than constitution
महाराष्ट्र विधानसभेचं अधिवेशन एक दिवसानं पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आहे. शनिवारी आणि रविवारी म्हणजे 2 आणि 3 जुलैला होणारे अधिवेशन पुढे ढकलण्यात आलं आहे. हे अधिवेशन आता 3 आणि 4 जुलै म्हणजे येत्या रविवार आणि सोमवारी होणार आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नव नियुक्त सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी हे अधिवेशन बोलावलं आहे.
याच अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची देखील निवड केली जाणार आहे. दरम्यान विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. त्यांच्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Assembly session : विधिमंडळाच्या अधिवेशनाची तारीख बदलली, एक दिवसानं अधिवेशन ढकललं पुढे
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
