एक्स्प्लोर

डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोननंतर फक्त 5 तासातच नरेंद्र मोदींनी युद्ध थांबवलं, राहुल गांधींचा गंभीर आरोप

पंतप्रधान मोदींनी पाकिस्तान विरोधात सुरु असलेली दहशतवादी छावण्यांवरील भारताची कारवाई तात्काळ थांबवली होती. यावरुन काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर गंभीर आरोप केले आहेत.

Rahul Gandhi on PM Narendra Modi :  काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पंतप्रधान मोदींनी पाकिस्तान विरोधात सुरु असलेली दहशतवादी छावण्यांवरील भारताची कारवाई तात्काळ थांबवली होती. त्यांनी हे सर्व अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सूचनेवरुन केल्याचे  राहुल गांधी म्हणाले. डोनाल्ड ट्रम्प यांनी 24 तासात पाकिस्तानविरोधात सुरु असलेली कारवाई थांबवण्याचे सांगितले होते, मात्र, नरेंद्र मोदींनी 24 तासांत नाही तर 5 तासांत सर्व काही थांबवल्याचा आरोप राहुल गांधींनी केला आहे. 

बुधवारी बिहारमधील मुझफ्फरपूर येथे 'मतदार हक्क यात्रा' रॅलीत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर गंभीर आरोप केले. ते म्हणाले की, मोदींनी पाकिस्तानमधील दहशतवादी छावण्यांवरील भारताची कारवाई तात्काळ थांबवली होती आणि हे सर्व अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सूचनेवरून घडले होते.

ट्रम्पच्या दाव्यांवर राहुल गांधी काय म्हणाले?

जेव्हा भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध सुरू होते, तेव्हा ट्रम्प यांनी नरेंद्र मोदींना फोन केला होता. त्यांना जे काही सुरु आहे ते 24 तासात थांबवा. यानंतर नरेंद्र मोदींनी 24 तासांत नाहीतर फक्त 5 तासातच सर्व काही थांबवल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. 

ट्रम्प यांनी पुन्हा एकदा युद्धबंदी आणल्याचा दावा 

डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच पुन्हा सांगितले की त्यांनी भारत आणि पाकिस्तानमधील लष्करी संघर्षादरम्यान हस्तक्षेप केला होता. त्यांनी युद्ध रोखण्यात भूमिका बजावली होती. त्यांनी व्यापार आणि शुल्काची धमकी देऊन मोदींना युद्धबंदी करण्यास भाग पाडले. त्यांनी व्हाईट हाऊसमधील बैठकीत दावा केला की, 'मी मोदी आणि पाकिस्तानशी बोललो आणि सांगितले की जर तुम्ही युद्ध थांबवले नाही तर आम्ही कोणताही व्यापार करार करणार नाही आणि उच्च शुल्क लादू. त्यानंतर मोदींनी फक्त पाच तासातच सर्व काही थांबवले. डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यानुसार, मी पाकिस्तानला सांगितले होते की आम्ही कोणताही व्यापार करार करणार नाही, आम्ही तुमच्यावर इतके उच्च शुल्क लादू की तुम्हाला समजूही शकणार नाही. तुम्ही अणुयुद्धाकडे जात आहात आणि हे होणे शक्य नाही. त्यानंतर पाच तासात युद्ध थांबवल्याचे राहुल गांधी म्हणाले. 

भारताने ट्रम्प यांचे दावे फेटाळले

भारताने ट्रम्प यांचे हे दावे सातत्याने फेटाळले आहेत. भारताचे म्हणणे आहे की पाकिस्तानसोबत गोळीबार आणि युद्धबंदीचा करार दोन्ही देशांच्या सैन्याच्या महासंचालकांच्या (डीजीएसएमओ) पातळीवर थेट चर्चेनंतर झाला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधीच संसदेत स्पष्ट केले आहे की कोणत्याही देशाचा नेता भारताला त्यांची लष्करी कारवाई कधी थांबवायची हे सांगू शकत नाही. ते म्हणाले की 'ऑपरेशन सिंदूर' थांबवण्याचा निर्णय भारताने स्वतःहून घेतला होता आणि कोणत्याही बाह्य दबावाखाली नाही.

महत्वाच्या बातम्या :

Donald Trump : भारत पाकिस्तान युद्ध थांबवलं, सहा युद्धांमध्ये मध्यस्ती, डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल द्या; व्हाईट हाऊसची मागणी

महत्त्वाच्या बातम्या

मजुरांचा प्रामाणिकपणा, खोदकाम करताना सापडलेली 14 सोन्याची नाणी ग्रामपंचायतीकडं दिली; नाण्यांवर हत्तीचं चित्र
मजुरांचा प्रामाणिकपणा, खोदकाम करताना सापडलेली 14 सोन्याची नाणी ग्रामपंचायतीकडं दिली; नाण्यांवर हत्तीचं चित्र
राज ठाकरेंच्या मताशी पुतण्या सहमत; गणेशोत्सावत दंगल वक्तव्यामागचं आदित्य ठाकरेंनी सांगितलं राज'कारण'
राज ठाकरेंच्या मताशी पुतण्या सहमत; गणेशोत्सावत दंगल वक्तव्यामागचं आदित्य ठाकरेंनी सांगितलं राज'कारण'
अंगणवाडीतील निकृष्ट आहाराची तक्रार केली, वरिष्ठांकडून मानिसक छळ; अखेर अंगणवाडी मदतनीसचा राजीनामा
अंगणवाडीतील निकृष्ट आहाराची तक्रार केली, वरिष्ठांकडून मानिसक छळ; अखेर अंगणवाडी मदतनीसचा राजीनामा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 सप्टेंबर 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 सप्टेंबर 2026 | रविवार

व्हिडीओ

Raj Thackeray Thane Speech : अमित ठाकरेंनी पंतप्रधानांचा फोटो हटवला; आता राज ठाकरे इशारा देत म्हणाले
Shahajibapu Patil News : 'अशोक खरातचा सांगोल्यातही धिंगाणा, चित्रपटात याचा समावेश आहे का?'
Dahihandi 2026 Omkar Govinda Pathak Thane 9 Thar: कडक 9 थर रचले, मग टॉपचे 4 थर हवेत; ठाण्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Dahihandi 2026 Aryans Govinda Pathak 10 Thar: 10 थर बसले, 10 वा उठण्याच्या आधी कोसळले; आर्यन्स गोविंदा पथकाचा 10 थरांचा थरारक VIDEO
Dahihandi 2026: मनसेच्या दहीहंडीत 9 व्या थरावरुन गोविंदा कोसळला; थरारक VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: अन् महिंद्रा स्कॉर्पिओ मालकानं थेट बंगल्याच्या दुसऱ्या मजल्यावर क्रेनने उचलून पार्क केली! कारण ऐकून डोक्याला हात लावायची पाळी
Video: अन् महिंद्रा स्कॉर्पिओ मालकानं थेट बंगल्याच्या दुसऱ्या मजल्यावर क्रेनने उचलून पार्क केली! कारण ऐकून डोक्याला हात लावायची पाळी
मजुरांचा प्रामाणिकपणा, खोदकाम करताना सापडलेली 14 सोन्याची नाणी ग्रामपंचायतीकडं दिली; नाण्यांवर हत्तीचं चित्र
मजुरांचा प्रामाणिकपणा, खोदकाम करताना सापडलेली 14 सोन्याची नाणी ग्रामपंचायतीकडं दिली; नाण्यांवर हत्तीचं चित्र
Pakistan Cricket : भारताला वर्ल्ड कपमध्ये 10 विकेटनं पराभूत करताच पाकिस्तान क्रिकेटची बर्बादी सुरु,पाकच्या माजी क्रिकेटपटूनं धक्कादायक वास्तव मांडलं 
भारतावर वर्ल्ड कपमध्ये विजय मिळवल्यानंतर पाकिस्तान क्रिकेटची वाट लागली, पाकच्या माजी क्रिकेटपटूचा धक्कादायक दावा
राज ठाकरेंच्या मताशी पुतण्या सहमत; गणेशोत्सावत दंगल वक्तव्यामागचं आदित्य ठाकरेंनी सांगितलं राज'कारण'
राज ठाकरेंच्या मताशी पुतण्या सहमत; गणेशोत्सावत दंगल वक्तव्यामागचं आदित्य ठाकरेंनी सांगितलं राज'कारण'
'जम्मू आणि काश्मीर, लडाख आमच्या नकाशाप्रमाणेच दिसले पाहिजे, आमच्या सीमा पक्क्या आहेत' नव्या जागतिक नकाशावर भारताचा आक्षेप
'जम्मू आणि काश्मीर, लडाख आमच्या नकाशाप्रमाणेच दिसले पाहिजे, आमच्या सीमा पक्क्या आहेत' नव्या जागतिक नकाशावर भारताचा आक्षेप
अंगणवाडीतील निकृष्ट आहाराची तक्रार केली, वरिष्ठांकडून मानिसक छळ; अखेर अंगणवाडी मदतनीसचा राजीनामा
अंगणवाडीतील निकृष्ट आहाराची तक्रार केली, वरिष्ठांकडून मानिसक छळ; अखेर अंगणवाडी मदतनीसचा राजीनामा
दिल्लीत इमारतीच्या ढिगाऱ्याखाली गाडलेला तरुण जिवंत सापडला, अजून किती चिरडले याचा थांगपत्ता नाही, अनेक गाड्यांचा सुद्धा चक्काचूर, थरकाप उडवणारे 10 फोटो

Embed widget