एक्स्प्लोर

Donald Trump : भारत पाकिस्तान युद्ध थांबवलं, सहा युद्धांमध्ये मध्यस्ती, डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल द्या; व्हाईट हाऊसची मागणी

Nobel Peace Prize : डोनाल्ड ट्रम्प यांनी सहा महिन्यात सहा मोठी युद्ध थांबवली किंवा शांतता करारामध्ये मध्यस्ती केली. त्यामुळे त्यांना नोबेल पुरस्कार द्यावा अशी मागणी व्हाईट हाऊसने केली आहे.

Donald Trump Claim Nobel Peace Prize : गेल्या सहा महिन्यात डोनाल्ड ट्रम्प यांनी सहा मोठी युद्ध थांबवली आहेत. भारत आणि पाकिस्तानच्या युद्धात ट्रम्प यांनी मध्यस्ती करून ते थांबवलं. त्यामुळे त्यांना नोबेल पुरस्कार द्यावा अशी मागणी व्हाईट हाऊसने केली आहे. व्हाईट हाऊसच्या माध्यम सचिव कॅरोलिन लेव्हिट यांनी ही मागणी केली आहे.

White House PC : व्हाईट हाऊसची मागणी काय?

व्हाईट हाऊसच्या माध्यम सचिवांनी एक पत्रकार परिषद घेऊन ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार देण्याची मागणी केली आहे. त्या म्हणाल्या की, ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान, इराण आणि इस्त्रायल यांच्यासह सहा देशांमध्ये सुरू असलेले युद्ध डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं. या सगळ्याचा अर्थ म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सहा महिन्याच्या कार्यकाळात महिन्याला सरासरी एक शांतता करार केला किंवा युद्धविराम घडवून आणला आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांना आता शांततेचा नोबेल पुरस्कार द्यावा अशी मागमी व्हाईट हाऊसकडून करण्यात आली आहे.

ट्रम्प यांनी कोणती युद्धे थांबवल्याचा दावा केला?

  • भारत आणि पाकिस्तान
  • थाललंड आणि कंबोडिया
  • इस्त्रायल आणि इराण
  • रवांडा आणि डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो
  • सर्बिया आणि कोसोवो
  • इजिप्त आणि इथिओपिया

भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध थांबवल्याचा दावा

पहलगाम दहशतवादी हल्लानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता. भारताने पाकिस्तानमध्ये शिरून तिथले दहशतवादी तळ उद्ध्वस्त केली होती. त्यानंतर पाकिस्तानने केलेले ड्रोन हल्लेही निकामी केले होते. या दोन्ही देशांमध्ये मोठं युद्ध होणार अशी शक्यता असताना दोन्ही देशांनी अचानक युद्धबंदीची घोषणा केली.

पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या मागणीनंतर ही युद्धबंदी करण्यात आल्याचं भारताने स्पष्ट केलं. परंतु, भारत आणि पाकिस्तान या दोन अणवस्त्रधारी देशांमध्ये आपणच मध्यस्ती केली आणि युद्ध थांबवलं असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. हा दावा त्यांनी आतापर्यंत अनेकदा केला आहे.

ट्रम्प यांची पाकिस्तानवर मेहरबानी

डोनाल्ड ट्रम्पनी पाकिस्तानवर मेहरबानी करत भारताला डिवचल्याचं दिसून आलं. भारतावर 25 टक्के टॅरिफ लावणाऱ्या अमेरिकेने पाकिस्तानच्या मालावर फक्त 19 टक्क्यांचा टॅरिफ लावला आहे. ट्रम्पकडून पाकिस्तानवर 29 टक्क्यांऐवजी 19 टक्के टॅरिफ लावला. त्यामुळे भारत, बांग्लादेश, व्हिएतनामच्या वस्त्रोद्योगाला फटका बसणार आहे.

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

Nvidia CEO Jensen Huang and Alice Huang: अमेरिकेच्या बड्या टेक कंपनीच्या CEO चं चिनी गुप्तहेर महिलेसोबत लफडं कसं बाहेर आलं, जगाचं लक्ष का?
अमेरिकेच्या बड्या टेक कंपनीच्या CEO चं चिनी गुप्तहेर महिलेसोबत लफडं कसं बाहेर आलं, जगाचं लक्ष का?
लोकांची उंची फक्त तीन फूट, घरांचे दरवाजेही तीनच फूट, जगातील अनोख्या गावचा व्हिडिओ व्हायरल
लोकांची उंची फक्त तीन फूट, घरांचे दरवाजेही तीनच फूट, जगातील अनोख्या गावचा व्हिडिओ व्हायरल
ना गोलंदाजी, ना फलंदाजी, तरीही 'सामनावीर'चा पुरस्कार मिळाला, 'या' खेळाडूच्या नावावर अनोखा विक्रम
ना गोलंदाजी, ना फलंदाजी, तरीही 'सामनावीर'चा पुरस्कार मिळाला, 'या' खेळाडूच्या नावावर अनोखा विक्रम
Modi Zelenskyy Phone Call : रशिया-युक्रेन युद्धामध्ये शांततेचा तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू; पंतप्रधान मोदींचा झेलेंस्कींना फोन
रशिया-युक्रेन युद्धामध्ये शांततेचा तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू; पंतप्रधान मोदींचा झेलेंस्कींना फोन

व्हिडीओ

Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका
Majha Katta Mrudula Dadhe EP 1 : अजरामर गाण्यांमागच्या अफलातून गोष्टी, मृदुला दाढेंसोबत शब्दसुरांची मैफल
Satej Patil PC : धमक्या कुणाला देताय? मी सुद्धा पाटील, ३-३ मंत्र्यांना उत्तर UNCUT PC
Hasan Mushrif speech Gokul : ... ती बंटी पाटलांची शेवटची सभासमजा, 13 संचालकांना इशारा
Gokul Chairman Rajesh Patil: हसन मुश्रीफ भाषणाला उभे राहताच महायुतीचा उमेदवार जिंकला; गोकुळमध्ये काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अर्शदीपची समरीनकडून विकेट; टीम इंडियाच्या गोलंदाजाचा फिल्मीस्टाईल प्रपोज, साखरपुड्यानंतर नवी इनिंग
अर्शदीपची समरीनकडून विकेट; टीम इंडियाच्या गोलंदाजाचा फिल्मीस्टाईल प्रपोज, साखरपुड्यानंतर नवी इनिंग
संपत्तीपुढे नात्याचं मोलच नाही; कल्याणमध्ये वडिलांसह सख्ख्या भावावर झाडल्या गोळ्या, मुलगा अटकेत
संपत्तीपुढे नात्याचं मोलच नाही; कल्याणमध्ये वडिलांसह सख्ख्या भावावर झाडल्या गोळ्या, मुलगा अटकेत
Kavya Maran Marriage : काव्या मारन-अनिरुद्ध रविंचंदर विवाहबंधनात अडकले, ग्रीसमध्ये विवाहसोहळा संपन्न, लग्नाचे फोटो शेअर करताच शुभेच्छांचा पाऊस
काव्या मारन-अनिरुद्ध रविंचंदर विवाहबंधनात अडकले, ग्रीसमध्ये विवाहसोहळा संपन्न, रजनीकांत यांची हजेरी
सुनेत्रा पवारांची शेतकऱ्याच्या घरी दिवाळी; पिठलं-भाकर खाऊन साधला संवाद, पाणी काटकरीने वापरण्याचा दिला सल्ला
सुनेत्रा पवारांची शेतकऱ्याच्या घरी दिवाळी; पिठलं-भाकर खाऊन साधला संवाद, पाणी काटकरीने वापरण्याचा दिला सल्ला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेबर 2026 | बुधवार
Gold Rate : भाऊबीजेच्या दिवशी सोनं महागलं की स्वस्त झालं? 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे IBJA चे दर जाणून घ्या
भाऊबीजेच्या दिवशी सोनं महागलं की स्वस्त झालं? 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
मोठी बातमी, महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! लाडघर, गुहागर आणि श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय ‘ब्ल्यू फ्लॅग’ पुरस्कार
महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! लाडघर, गुहागर आणि श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय ‘ब्ल्यू फ्लॅग’ पुरस्कार
कुर्ल्यात 6 महिन्यात दोन सख्ख्या भावांना संपवलं; गोळीबारात विनोद पवारांचा मृत्यू, कुटुंबीयांचा पोलिसांसमोर ठिय्या
कुर्ल्यात 6 महिन्यात दोन सख्ख्या भावांना संपवलं; गोळीबारात विनोद पवारांचा मृत्यू, कुटुंबीयांचा पोलिसांसमोर ठिय्या
Embed widget