(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rahul Gandhi : मोदी सरकारकडून शेतकऱ्यांवर अन्याय, रोजगार नाही; राहुल गांधींच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे
Rahul Gandhi Speech Top 10 highlights : राहुल गांधी यांनी आज शेगावमध्ये आयोजित सभेमध्ये बोलताना भाजपवर हल्लाबोल केला.राहुल गांधींच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे
Rahul Gandhi Speech : देशात आज भाजपनं हिंसा, द्वेश आणि दहशत पसरवली आहे. या दहशत, द्वेष आणि हिंसेच्या विरोधात ही यात्रा सुरु केली. या यात्रेचं ध्येय कुणाला काही समजवायचं नाही. या यात्रेचा उद्देश आपला आवाज, आपलं दु:ख समजून घेण्याचा आहे, असं काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. राहुल गांधी आज शेगावमध्ये आयोजित सभेमध्ये बोलत होते. राहुल गांधी म्हणाले की, 70 दिवसांआधी ही यात्रा कन्याकुमारीपासून सुरु झाली. समुद्रकिनारी यात्रेला सुरुवात झाली. प्रत्येक दिवशी 25 किलोमीटर ही यात्रा चालते. तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, तेलंगाणा, आंध्र आणि आता महाराष्ट्रात ही यात्रा आली. विरोधकांनी सवाल केला होता की, यात्रेची गरज काय? काय फायदा आहे?
राहुल गांधींच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे
70 दिवसांआधी ही यात्रा कन्याकुमारीपासून सुरु झाली. समुद्रकिनारी यात्रेला सुरुवात झाली. प्रत्येक दिवशी 25 किलोमीटर ही यात्रा चालते. तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, तेलंगाणा, आंध्र आणि आता महाराष्ट्रात ही यात्रा आली.
यात्रेची गरज काय? काय फायदा आहे? देशात आज भाजपनं हिंसा, द्वेश आणि दहशत पसरवली आहे. या दहशत, द्वेष आणि हिंसेच्या विरोधात ही यात्रा सुरु केली. या यात्रेचं ध्येय कुणाला काही समजवायचं नाही. या यात्रेचा उद्देश आपला आवाज, आपलं दु:ख समजून घेण्याचा आहे
ही भूमी छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकरांची आहे. जगाला दिशा देणाऱ्या शिवरायांची ही भूमी आहे. इथे विदर्भातील शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागतोय.
विम्याचे पैसे भरुन देखील शेतकऱ्यांना पैसे मिळत नाहीत. मोदी सरकारकडून शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही.
शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळत नाही. काही उद्योगपतींचं मात्र हजारो कोटींचं कर्ज माफ केलं जातं, दोन-तीन उद्योगपती देशाचं कर्ज बुडवत आहेत
शेतकऱ्यांसोबत युवकही भेटतात. त्यांचे पालक लाखो रुपये भरुन प्रवेश घेतात. इंजिनिअरिंग करतात. मेकनिकल करतात आणि नंतर मजूरी करतात, ओला उबेरवर नोकरी करतात. मुलं लाखो रुपए खर्च करुन शिक्षण घेतात. तरीही त्यांना रोजगार मिळत नाही, तरुणांना रोजगार नसलेला भारत आम्हाला नको आहे.
भीती, हिंसा, द्वेषानं तोडलं जातं तर प्रेमानं सर्व जोडलं जातं. भारत जोडोचं ध्येय हे 'मन की बात' करण्यासाठी नाही.
या भागात सहा महिन्यात किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केली? का केली? कुठल्याही शेतकऱ्याशी बोला. आम्हाला योग्य भाव मिळत नाही. हेच ऐकतोय. का होतेय? विम्याचे पैसे भरले. नुकसान होते, एक रुपयाची मदत मिळत नाही.
लाख रुपयाच्या कर्जासाठी शेतकरी आत्महत्या करतात. लाखाचे कर्ज आमचे माफ होत नाही. उद्योगपतींचे कोटी, अरबो रुपये माफ होतात, असे का?
युपीए असताना, आम्ही विदर्भासाठी कर्जमाफी केली होती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, पंतप्रधान, प्रेमाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे ऐकले तर, कुणीही आत्महत्या करणार नाही. त्यांचा आवाज ऐकला तर, त्यांना मदत होईल.
ही बातमी देखील नक्की वाचा