एक्स्प्लोर

वाधवान कुटुंबाचा क्वॉरन्टाईन काळ आज संपणार, कोर्टात हजर करण्याची शक्यता

बँक घोटाळ्याचा आरोप असलेले वाधवान बंधु कुटुंबासोबत लॉकडाऊन असतानाही महाबळेश्वरला पोहोचलं. त्यांना पाचगणीत क्वॉरन्टाईन केलं होतं. त्यांना आज कोर्टात हजर केलं जाण्याची शक्यता आहे

सातारा : साताऱ्यात असलेल्या वाधवान कुटुंबियांचा क्वॉरन्टाईन काळ आज संपणार आहे. त्यांना आज महाबळेश्वरमधील न्यायालयात हजर केलं जाणार असल्याचं समजतं. त्यांना ताब्यात घेण्यासाठी पोलीस पाचगणीत दाखल होतील. तपासणी करुन सकाळी दहाच्या सुमारास त्यांना महाबळेश्वरला रवान केलं जाईल.

सीबीआय कोर्टाने वाधवान कुटुंबाला 5 मेपर्यंत महाबळेश्वर न सोडण्याचे आदेश दिल्याचं कळतं. त्यामुळे आज त्यांना जामीन मिळालाच तर 5 मे पर्यंत महाबळेश्वरमध्येच राहतील. त्यांच्या हातावर होम क्वॉरन्टाईनचा शिक्का मारुन, महाबळेश्वरमधील त्यांच्या फार्म हाऊसवर क्वॉरन्टाईन केलं जाईल. होम क्वॉरन्टाईन केल्यामुळे त्यांना 14 दिवस बंगल्यातून बाहेर जाता येणार नाही.

"वाधवान कुटुंबाचा क्वॉरन्टाईन पीरियड दुपारी दोन वाजता संपत असून आम्ही ईडी आणि सीबीआयला पत्र लिहून त्यांचा ताबा घेण्याची विनंती केली आहे," अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल (22 एप्रिल) दिली होती. परंतु सीबीआयची टीम पाचगणीत अद्याप दाखल झालेली नाही.

वाधवान कुटुंबाचा क्वॉरन्टाईन काळ आज संपणार, कोर्टात हजर करण्याची शक्यता पोलिसांचं सीबीआयला पत्र वाधवान कुटुंबाचा क्वॉरन्टाईन काळ आज संपणार, कोर्टात हजर करण्याची शक्यता पोलिसांचं ईडीला पत्र

पोलीस आणि आरोग्य यंत्रणेत समन्वय नाही? गृह मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या परवानगीचं पत्र दाखवून वाधवान कुटुंब महाबळेश्वरमध्ये दाखल झालं होतं. त्यानंतर या सगळ्यांना एका हायस्कूलमध्ये इन्स्टिट्यूशलन क्वॉरन्टाईनमध्ये ठेवण्यात आलं. खरंतर त्यांचा क्वॉरन्टाईन काळ आज (23 एप्रिल) संपत असताना, जिल्हा पोलिस प्रमुखांनी सीबीआयला 14 तारखेला पाठलेल्या पत्रात 22 तारखेला वाधवान कुटुंबाचा क्वॉरन्टाईन पीरियड संपत असल्याचं कळवलं होतं. तर वैद्यकीय यंत्रणेने मात्र त्यांचा क्वॉरन्टाईन पीरियड 22 तारखेला संपत नसल्याचे सांगितलं. त्यामुळे सातारा पोलिस आणि आरोग्य यंत्रणा यांचा या प्रकरणात समन्वय नसल्याचं दिसून आलं.

वाधवान कुटुंबाला कुठेही जाऊ देऊ नका, सीबीआयची सातारा जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

लॉकडाऊनमध्ये वाधवान कुटुंबाचा महाबळेश्वरपर्यंत प्रवास बँक घोटाळ्याचा आरोप असलेले वाधवान बंधु कुटुंबासोबत लॉकडाऊन असतानाही महाबळेश्वरला पोहोचलं. महत्त्वाचं म्हणजे विशेष गृहसचिव अमिताभ गुप्ता यांच्या परवानगीचं पत्र घेऊन वाधवान कुटुंबाने मुंबईहून महाबळेश्वरला गाडीतून प्रवास केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार वाधवान कुटुंबावर गुन्हा दाखल झाला होता. परंतु वाधवान कुटुंबाला सीबीआयने ताब्यात घेतलं नव्हतं. वाधवान कुटुंबापैकी काही जणांना कोरोनाव्हायरसची लागण झालेली असू शकते, अशी शंका असल्याने सीबीआयने अख्ख्या कुटुंबाला क्वॉरन्टाईन करण्याचा निर्णय घेतला होता.

शरद पवारांच्या पाठिंब्याशिवाय वाधवान कुटुंबाला गृह सचिवांकडून परवानगी पत्र मिळणं अशक्य : किरीट सोमय्या

कपिल वाधवान, धीरज वाधवान रियल इस्टेट कंपनी एचडीआयएल (HDIL), फायनान्स कंपनी डीएचएफएल (DHFL) सह अनेक कंपन्यांचे मालक आहेत. वाधवान बंधु डीएचएफएल आणि येस बँक घोटाळ्याप्रकरणी जामीनावर बाहेर आहे. याशिवाय वाधवान बंधु पीएमसी बँक घोटाळ्यातही आरोपी आहेत.

कोणाच्या आदेशाने किंवा आशीर्वादाने वाधवान कुटुंब महाबळेश्वरमध्ये? मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावं : देवेंद्र फडणवीस

स्थानिकांच्या तक्रारीनंतर वाधवान कुटुंब ताब्यात वाधवान कुटुंब मुंबईच्या वांद्र्यातील पाली हिल परिसरातं राहतं. मुंबईहून हे कुटुंब महाबळेश्वरमध्ये पोहोचलं असता, स्थानिकांनी 23 जणांना पाहून याचा विरोध केला आणि लॉकडाऊनदरम्यान हे लोक महाबळेश्वरला कसे पोहोचले. काही रहिवाशांनी याची तक्रार स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये केली आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. महाबळेश्वरमध्ये पोहोचलेल्या सगळ्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. सध्या वाधवान कुटुंबातील सर्व सदस्यांना विलग करण्यात आलं आहे. महाबळेश्वरमध्ये दाखल झालेल्यांमध्ये कुटुंबातील महिला आणि मुलांचाही समावेश आहे.

विशेष गृहसचिव अमिताभ गुप्ता सक्तीच्या रजेवर लॉकडाऊन आणि संचारबंदी असतानाही येस बँक घोटाळ्यातील वाधवान कुटुंबातील 23 जण सात गाड्यांमधून मुंबईहून महाबळेश्वरला गेल्याचं उघडं झालं. विशेष म्हणजे त्यांच्याकडे गृह मंत्रालयाचे विशेष सचिव अमिताभ गुप्ता यांचं पत्र मिळालं. यानंतर वाधवान कुटुंबीयांना प्रवासाची परवानगी देणारे विशेष गृहसचिव अमिताभ गुप्ता यांना तातडीने सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे. त्यांच्याविरुद्धची चौकशी संपेपर्यंत ते सक्तीच्या रजेवर असतील, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

लॉकडाऊनमध्ये येस बँक घोटाळ्यातील वाधवान कुटुंबीय महाबळेश्वरला, गृह मंत्रालयाच्या विशेष सचिवाचं पत्र मिळाल्याने खळबळ

'त्या' 23 जणांमध्ये कुणाचा समावेश?

कपिल वाधवान अरुणा वाधवान वनिता वाधवान टीना वाधवान धीरज वाधवान कार्तिक वाधवान पूजा वाधवान युविका वाधवान अहान वाधवान शत्रुघ्न घागा मनोज यादव विनीद शुक्ला अशोक वाफेळकर दिवाण सिंग अमोल मंडल लोहित फर्नांडिस जसप्रीत सिंह अरी जस्टीन ड्मेलो इंद्रकांत चौधरी प्रदीप कांबळे एलिझाबेथ अय्यापिल्लई रमेश शर्मा तारकर सरकार

Wadhawan in Mahabaleshwar | लॉकडाऊनमध्ये येस बँक घोटाळ्यातील वाधवान कुटुंबीय महाबळेश्वरला | ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Israel–Hezbollah conflict : युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis : फडणवीसांच्या कार्यालयावर हल्ला करणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा दाखलDevendra Fadnavis : फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणाऱ्या, धनश्री सहस्रबुद्धे मनोरुग्णDevendra Fadnavis Office : उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर महिलेकडून तोडफोडMaharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 04 PM 27 Sept 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Israel–Hezbollah conflict : युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Devendra Fadnavis : मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Embed widget