एक्स्प्लोर

Pune to mumbai flight fare : आनंदाची बातमी! पुणे-मुंबई थेट विमानसेवा सुरु होणार; किती असणार तिकीट?

Mumbai Pune Flight : मुंबई-पुणे प्रवास आता एका तासावर येणार आहे. पुणे आणि मुंबई या दोन महत्त्वाच्या शहरांदरम्यान थेट विमानसेवा सुरू करण्याची अनेक वर्षांपासूनची मागणी अखेर पूर्ण होणार आहे.

Pune to Mumbai Flight : रोज मुंबई-पुणे प्रवास (Pune to mumbai flight fare) करणाऱ्यांची संख्या प्रचंड प्रमाणात आहेत. त्यांना प्रवास करण्यासाठी वेगवेगळ्या रेल्वे उपलब्ध आहेत किंवा काही बसेसदेखील उपलब्ध आहे. मुंबई-पुणे प्रवास करण्यासाठी चार तास लागतात मात्र हाच प्रवास जर एका तासावर येणार आहे, असं आम्ही सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही मात्र हे खरंय. मुंबई-पुणे प्रवास आता एका तासावर येणार आहे. पुणे आणि मुंबई या दोन महत्त्वाच्या शहरांदरम्यान थेट विमानसेवा सुरू करण्याची अनेक वर्षांपासूनची मागणी अखेर पूर्ण होणार आहे. एअर इंडिया 26 मार्चपासून थेट उड्डाण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. थेट उड्डाणामुळे दोन मेट्रो शहरांमधील प्रवासाचा नेहमीचा वेळ तीन तासांवरून एक तासापर्यंत कमी होईल.

विशेष म्हणजे या दोन गजबजलेल्या कॉस्मोपॉलिटन शहरांमध्ये थेट विमानसेवा नव्हती. एअर इंडिया थेट उड्डाण करणारी पहिली ऑपरेटर ठरली. वेळेची बचत होण्यासाठी ही सेवा सुरु  करण्यात आली आहे. आतापर्यंत पुणेकर किंवा मुंबईकर दोन्ही शहरात ये-जा करण्यासाठी रेल्वे किंवा बसचा वापर करत होते. मात्र लागणारा वेळ पाहता दोन्ही शहरात एअर इंडिया थेट उड्डाण करण्याचा निर्णय घेतला आहे. काही वर्षांपूर्वी मुंबई-पुणे थेट विमानसेवा होती मात्र  2019 मध्ये बंद करण्यात आली होती.

उड्डाणे शनिवार वगळता आठवड्यातून सहा दिवस सध्याच्या वेळापत्रकानुसार चालतील. एअर इंडियाचे विमान पुणे विमानतळावरून सकाळी 11.20 वाजता निघून मुंबईत 12.20 वाजता पोहोचेल. त्यासाठीचे बुकिंगही सुरू झाले आहे. एअर इंडियाच्या घोषणेमुळे पुणेकरांना काहीसा दिलासा मिळणार आहे. जे वारंवार कामानिमित्त किंवा इतर कारणांसाठी मुंबईत जात असतात त्यांच्यासाठी ही विमानसेवा सोयीची ठरणार आहे. 

विमानाची तिकीट किती असणार?

पुणे-मुंबई: सुटण्याची वेळ: सकाळी 11:20 आणि आगमनाची वेळ: दुपारी 12:20

तिकीट दर: इकॉनॉमी: 2,237 रुपये आणि बिझनेस क्लास: 18,467 रुपये

पुण्यातून  जर्मनी , इंग्लंड आणि अमेरिकेसाठी विमानसेवा सुरु होणार

पुण्यातून थेट जर्मनी , इंग्लंड आणि अमेरिकेसाठी  विमानसेवा सुरु होणार आहे, अशी घोषणा केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी केली आहे. त्यामुळे काही दिवसातच ही सेवा सुरु होणार आहे. त्यासोबतच पुणे विमानतळावरील प्रवाशांची रोजची गर्दी लक्षात घेऊन आम्ही संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना पुण्यातील आठ स्लॉट वाढवण्याची विनंती केली आहे.  तब्बल 14 स्लॉट वाढवले. त्यामुळे आता विमानतळावरील गर्दी कमी होण्यास मोठी मदत होणार असल्याचे शिंदे म्हणाले.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MNS-Shivsena Sewri : प्रतिस्पर्धी अजय चौधरी आणि बाळा नांदगावकरांचा नागरिकांशी दिलखुलास संवादMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  17 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaDaryapur Rada : दर्यापुरात राडा करणाऱ्यांना सकाळी 10 वाजेपर्यंत अटक करा -नवनीत राणाTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :17 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
×
Embed widget