एक्स्प्लोर

Pune RTE lottery : आरटीई प्रवेशासाठी एकूण जागांच्या तीन पट अधिक अर्ज; बुधवारी होणार ऑनलाइन सोडत

आरटीई 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेची ऑनलाइन सोडत शुक्रवारी पार पडणार आहे. या प्रवेश प्रक्रियेतंर्गत मुलांच्या प्रवेशासाठी प्रयत्न करणाऱ्या पालकांची प्रतीक्षा संपणार आहे.

Pune RTE lottery : आरटीई 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेची ऑनलाइन सोडत उद्या पार पडणार आहे. या प्रवेश प्रक्रियेतंर्गत मुलांच्या प्रवेशासाठी प्रयत्न करणाऱ्या पालकांची प्रतीक्षा संपणार आहे. दरवर्षीप्रमाणे 25 टक्के प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्यात ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येते. त्यानुसार 2023-24या शैक्षणिक वर्षासाठी  आरटीई 25टक्के प्रवेश प्रक्रियेची ऑनलाइन सोडत बुधवारी काढण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिली आहे. 

राज्यातील सुमारे 1 लाख 1 हजार 969 जागांवर प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेल्या तब्बल तीन लाख 64 हजार 472 विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची प्रतीक्षा बुधवारी अखेर संपणार आहे. यावेळी ऑनलाइन सोडतीत प्रवेश मिळालेल्या बालकांच्या प्रवेश अर्जात नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावर संदेश पाठविण्यात येईल. तसेच आरटीई पोर्टलवरही बालकांच्या प्रवेश अर्जासाठी केलेल्या लॉगिनमध्ये संबंधित बालकाला प्रवेशासाठी मिळालेल्या शाळेचा तपशील दिसणार आहे. याबाबत अधिक माहितीसाठी पालकांनी ‘https://rte25admission.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rteindex’ या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन शिक्षण विभागातर्फे करण्यात आले आहे.

राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात आले. राज्यातील 1 लाख 1 हजार 969 जागांसाठी 3 लाख 65 हजार 258 म्हणजेच प्रवेश क्षमतेच्या तीन पटीहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामुळे कोणत्या विद्यार्थ्याला लॉटरीच्या माध्यमातून प्रवेश मिळणार याबाबतची उत्सुकता निर्माण झाली आहे. प्रवेशासाठी अर्ज भरलेल्या सर्व पालकांना उद्याची प्रतिक्षा आहे. मुलांच्या उत्तर भविष्यासाठी प्रत्येक पालक या सोडतीकडे डोळे लावून बसले आहे. 

8 हजार 828 शाळांमध्ये 1 लाख 1 हजार 969 जागा उपलब्ध
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (Right To Education Act) खासगी प्राथमिक शाळांमधील 25 टक्के जागांवर आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकांमधील मुलांना पहिली ते आठवीपर्यंत मोफत शिक्षणाची संधी उपलब्ध करुन दिली जाते. आरटीई ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला 1 मार्चपासून सुरुवात झाली. तर ऑनलाईन अर्जांसाठी अंतिम मुदत 25 मार्च होती. यंदाच्या आरटीई प्रवेश प्रक्रियेत 8 हजार 828 शाळांमध्ये 1 लाख 1 हजार 969 जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. सर्वाधिक आरटीई प्रवेशाच्या जागा पुणे जिल्ह्यात असून यंदा प्रवेशासाठी सर्वाधिक विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. पुण्यातील आरटीईच्या 15 हजार 655 जागांसाठी 77 हजार 550 विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune crime : चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad Call Recording | वाल्मीक कराडच्या नव्या ऑडिओ क्लिपमध्ये मोठा खुलासा Special ReportOperation Dhanushybaan : ऑपरेशन धनुष्यबाण संकल्पनेचा उदय कसा झाला? Special ReportBangladeshi Ladki Bahin | भारतात बांगलादेशी लाडकी बहीण, नेमकं प्रकरण काय? Special ReportSharad Pawar Special Reportशुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात शरद पवार Ajit Pawarनी शेजारी बसणं टाळलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune crime : चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
Ajit Pawar: महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
Embed widget