एक्स्प्लोर

हॉटेलमध्ये सर्व्हिस चार्ज द्यायचा की नाही, पुण्यात हॉटेल मालकाची हुज्जत!

हॉटेलमधील सर्व्हिस चार्ज देण्यावरुन पुण्यातील एका हॉटेलमध्ये वादावादी झाली.

पुणे: हॉटेलमध्ये सर्व्हिस चार्ज अर्थात सेवा शुल्क देण्यास नकार देणाऱ्या आयटी कर्मचाऱ्याला शिवीगाळ करण्यात आली. पुण्यातील ‘1BHK सुपरबार’ या हॉटेल मालकांनी ग्राहकाला शिवीगाळ तर केलीच, पण झोमॅटोच्या वेबसाईटवर नकारात्मक रिव्ह्यू लिहिणाऱ्या मैत्रिणीच्या नंबरसाठी तगादाही लावल्याचा आरोप आहे. तर आपणच पीडित असून, चतु:श्रुंगी पोलीस स्थानकात तक्रार केली आहे, असा दावा हॉटेल मालकाने केला आहे. काय आहे प्रकरण? अखिल सिंह हे शनिवारी मित्रांसह बाणेरमधील ‘1BHK सुपरबार’ या हॉटेलमध्ये गेले होते. बिल आल्यानंतर त्यातील सर्व्हिस चार्ज देण्यास अखिल सिंह यांनी नकार दिला. हॉटेल व्यवस्थापनाने मग त्यांना बिलावर 10 टक्के सूट देऊ केली. पण अखिल सिंह यांनी ती सूट नाकारलीच, शिवाय त्यांनी सर्व्हिस चार्ज रद्द करण्याची मागणी केली. यादरम्यान अखिल सिंह यांच्यासोबत आलेल्या मैत्रिणीने हॉटेल्सची माहिती देणाऱ्या झोमॅटो या वेबसाईटवर ‘1BHK सुपरबार’चा नकारात्मक रिव्ह्यू लिहिला. शिवाय हॉटेलमध्ये जे घडलं त्याबाबत सविस्तर लिहिलं. संबंधित बातमी : हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये टीप देऊ नका, कारण...  त्याचवेळी अखिल सिंह यांना ‘1BHK सुपरबार’चे मालक रजत ग्रोव्हर यांचा फोन आला. ग्रोव्हर फोनवरुन सिंह यांच्या मैत्रिणीचा नंबर मागत होते. मात्र नंबर देण्यास नकार दिल्यानंतर, ग्रोव्हर यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप अखिल सिंह यांनी केला आहे. “सर्व्हिस चार्ज देणं बंधनकारक नाही त्यामुळे आम्ही तो देण्यास नकार दिला. मात्र या हॉटेलकडून सातत्याने तो आमच्यावर लादण्याचा प्रयत्न करण्यात आला. आम्हाला बिलावर डिस्काऊंटची गरज नव्हती, आम्ही त्याबाबतच हॉटेल मालकांना सांगत होतो, मात्र त्यांनी आरडाओरड सुरु केली. तसंच ते सतत माझ्या मैत्रिणीचा नंबर मागत होते. मी नंबर देण्यास नकार दिल्याने त्यांनी शिवीगाळ करत, माझ्यावर दमदाटी केली. मला फोनवरुन शिवीगाळ, धमकीचे मेसेज येऊ लागले. हा प्रकार वाढत चालल्यामुळे मी हा प्रकार सोशल साईट्सवर लिहिला. मात्र मला तिथेही ग्रोव्हर धमकावू लागले”, असं अखिल सिंह यांचं म्हणणं आहे. रजत ग्रोव्हर यांची पोलिसांत तक्रार दरम्यान, रजत ग्रोव्हर यांनी आपणच पीडित असून, चतु:श्रुंगी पोलीस स्थानकात तक्रार केली आहे. तसंच झोमॅटोशीही संपर्क साधून रिव्ह्यूबाबत पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे, असं म्हटलं आहे. “आम्ही सर्व्हिस चार्ज लावतो, अशी सूचना दिलेली आहे. अखिल सिंह त्यांच्या मैत्रिणीसोबत हॉटेलमध्ये आले. त्यावेळी त्यांनी आपण आयकर सहआयुक्त, तर मैत्रिण वकील असल्याचं सांगितलं. या दोघांनी सर्व्हिस चार्ज देणं नाकारलं, तेव्हा त्यांना डिस्काऊंट देण्यात आला. ते बिल त्यांनी भरलं आणि निघून गेले. मात्र त्यांच्या मैत्रिणीने ‘झोमॅटो’वर नकारात्मक रिव्ह्यू लिहिल्याचं मला दुसऱ्या दिवशी समजलं. त्यामध्ये तिने बिलामध्ये सर्व्हिस चार्ज लावल्याचं लिहिलं होतं. याबाबतच विचारण्यासाठी मी झोमॅटोकडून सिंह यांचा नंबर मिळवला आणि त्यांना कॉल केला. त्यांना त्यांच्या मैत्रिणीचा नंबर मागितला, पण त्यांनी दिला नाही. त्यांनी फोन ठेवून दिला, मात्र आमचं SMS वर मोठं संभाषण झालं. मी अधिक माहिती घेतली असता, अखिल सिंह हे आयकर अधिकारी नाहीत तर आयटी व्यावसायिक असल्याचं समजलं. मी त्यांना तसा मेसेज केला. मात्र झोमॅटो आणि रेडईडीटवर नकारात्मक रिव्ह्यू सुरुच होते. एकाच वेळी दिल्ली, बंगळुरु आणि कॅलिफोर्नियातून रिव्ह्यू येत होते. जे शनिवारी हॉटेलमध्ये आले ते लगेचच या ठिकाणी कसे पोहोचले? शिवाय अशा साईट्सवर माझं प्रोफाईल नाही, तरीही माझ्या नावे कमेंट जात होत्या. त्यामुळेच मी पोलिसांकडे तक्रार केली आहे”, असं ग्रोव्हर यांनी सांगितलं. प्रकरण मिटवा - सिंह दरम्यान, या प्रकरणावर पडदा पडू दे असं आता अखिल सिंह यांचं म्हणणं आहे. तसंच मी आयकर अधिकारी आहे अशी ओळख करुन देणं हे अर्धसत्य होतं. मी सेवेत होतो, मात्र गेल्या वर्षी मी स्वत:चा व्यवसाय सुरु करण्यासाठी नोकरी सोडली. हे प्रकरण आता इथेच थांबायला हवं, असं सिंह म्हणाले. दरम्यान, चतु:श्रुंगी पोलिसांत ग्रोव्हर यांच्याकडून कोणतीही तक्रार आलेली नाही, असं पोलिसांकडून सांगण्यात आलं. सर्व्हिस चार्ज म्हणजे काय? हॉटेल तुम्हाला जी सेवा देतात, त्याच्या मोबदल्यात सर्व्हिस चार्ज वसूल केला जातो. सर्व्हिस चार्जची टीप म्हणून वसुली केली जाते. यासाठी कोणताही नियम किंवा मार्गदर्शक तत्व नाहीत. हा सर्व्हिस चार्ज 4 टक्क्यांपासून 20 टक्क्यांपर्यंतही असू शकतो. काही रेस्टॉरंट असं समजतात की, त्यांच्या इथे टीप देणं आवश्यक आहे. त्यामुळे ते हा चार्ज वसूल करतात. मात्र सरकारच्या तिजोरीत फक्त सर्व्हिस टॅक्स आणि व्हॅट जमा होतो. सर्व्हिस टॅक्स म्हणजे काय? सर्व्हिस टॅक्स सरकारकडून लावण्यात येतो. हा सर्व्हिस चार्जपेक्षा वेगळा आहे. हा टॅक्स सरकारच्या तिजोरीत जमा होतो. संबंधित बातम्या हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये टीप देऊ नका, कारण...

महत्त्वाच्या बातम्या

Girish Vyas: आधी पक्षाच्या कार्यप्रणालीवर आगपाखड, आता मुख्यमंत्र्यांच्या शिष्टाईनंतर गिरीश व्यासांची सावरासावर; म्हणाले, पक्ष नेतृत्त्वाला अनेकदा कटू निर्णय घ्यावेच लागतात
आधी पक्षाच्या कार्यप्रणालीवर आगपाखड, आता मुख्यमंत्र्यांच्या शिष्टाईनंतर गिरीश व्यासांची सावरासावर; म्हणाले, पक्ष नेतृत्त्वाला अनेकदा कटू निर्णय घ्यावेच लागतात
Raju Shetti: ऊसदर जाहीर न करता ऊस तोडायला ती तुमच्या बापाची पेंड आहे का? राजू शेट्टींचा दिलीप वळसे पाटलांवर हल्लाबोल; म्हणाले, तेव्हा तुम्ही गोट्या खेळत होता का?
ऊसदर जाहीर न करता ऊस तोडायला ती तुमच्या बापाची पेंड आहे का? राजू शेट्टींचा दिलीप वळसे पाटलांवर हल्लाबोल; म्हणाले, तेव्हा तुम्ही गोट्या खेळत होता का?
Shardiya Navratri 2026: तुळजाभवानी देवीच्या खजिन्यात 253 किलो सोने, 4,523 किलो चांदी! माहिती अधिकारातून ऐतिहासिक ठेव्याची माहिती समोर
तुळजाभवानी देवीच्या खजिन्यात 253 किलो सोने, 4,523 किलो चांदी! माहिती अधिकारातून ऐतिहासिक ठेव्याची माहिती समोर
Soybean Rates Today: दुष्काळाने सोयाबीन हिरावलं; एकेका दाण्यासाठी शेतकरी धडपडतोय; तुमच्या बाजारसमितीत सोयाबीनला काय भाव मिळतोय?
दुष्काळाने सोयाबीन हिरावलं; एकेका दाण्यासाठी शेतकरी धडपडतोय; तुमच्या बाजारसमितीत सोयाबीनला काय भाव मिळतोय?

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raju Shetti: ऊसदर जाहीर न करता ऊस तोडायला ती तुमच्या बापाची पेंड आहे का? राजू शेट्टींचा दिलीप वळसे पाटलांवर हल्लाबोल; म्हणाले, तेव्हा तुम्ही गोट्या खेळत होता का?
ऊसदर जाहीर न करता ऊस तोडायला ती तुमच्या बापाची पेंड आहे का? राजू शेट्टींचा दिलीप वळसे पाटलांवर हल्लाबोल; म्हणाले, तेव्हा तुम्ही गोट्या खेळत होता का?
Soybean Rates Today: दुष्काळाने सोयाबीन हिरावलं; एकेका दाण्यासाठी शेतकरी धडपडतोय; तुमच्या बाजारसमितीत सोयाबीनला काय भाव मिळतोय?
दुष्काळाने सोयाबीन हिरावलं; एकेका दाण्यासाठी शेतकरी धडपडतोय; तुमच्या बाजारसमितीत सोयाबीनला काय भाव मिळतोय?
Gokul Election: जागावाटपात एकमेकांचा घामटा काढल्यानंतर आता महायुतीला क्रॉस व्होटिंगचा धसका; इतिहासात पहिल्यांदाच ठरावधारकांना सहलीवर पाठवणार, शपथा सुद्धा घेतल्या जाणार!
जागावाटपात एकमेकांचा घामटा काढल्यानंतर आता महायुतीला क्रॉस व्होटिंगचा धसका; इतिहासात पहिल्यांदाच ठरावधारकांना सहलीवर पाठवणार, शपथा सुद्धा घेतल्या जाणार!
Abhijeet Dipke Post Sonakshi Sinha Comment: अभिजीत दिपकेंची आजीसाठी खास पोस्ट, डोळे पाणावणारं एका शब्दाचं कॅप्शन, सोनाक्षी सिन्हा कमेंट करुन म्हणाली...
अभिजीत दिपकेंची आजीसाठी खास पोस्ट, डोळे पाणावणारं एका शब्दाचं कॅप्शन, सोनाक्षी सिन्हा कमेंट करुन म्हणाली...
Thane Crime Pradeep Purnekar: प्रदीप पूर्णेकर प्रकरणातला पाचवा हेल्मेटधारी मारेकरी पोलिसांनी पकडला, पण मुलाला ती गोष्ट खटकली, म्हणाला....
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातला पाचवा हेल्मेटधारी मारेकरी पोलिसांनी पकडला, पण मुलाला ती गोष्ट खटकली, म्हणाला....
Delhi CJP protest Jean Dreze: दिल्लीतील सरकारविरोधी आंदोलनातील 'तो' परदेशी व्यक्ती कोणी सोम्यागोम्या नव्हे तर आहे विख्यात अर्थतज्ज्ञ, कोण आहेत ज्यां द्रेज?
दिल्लीतील सरकारविरोधी आंदोलनातील 'तो' परदेशी व्यक्ती कोणी सोम्यागोम्या नव्हे तर आहे विख्यात अर्थतज्ज्ञ, कोण आहेत ज्यां द्रेज?
Sara Tendulkar birthday: सचिन तेंडुलकरांच्या लाडक्या लेकीचा वाढदिवस; वहिनी सानिया चंडोकसोबतचा VIDEO व्हायरल
सचिन तेंडुलकरांच्या लाडक्या लेकीचा वाढदिवस; वहिनी सानिया चंडोकसोबतचा VIDEO व्हायरल
Nagpur Crime : आधी स्वतः तलाक दिला, मग पूर्वाश्रमीच्या बायकोनं दुसरं लग्न केल्याचा राग अनावर, नमाज पठणासाठी गेलेल्या वसीमला रस्त्यात गाठलं अन्..., नागपूर हादरलं!
आधी स्वतः तलाक दिला, मग पूर्वाश्रमीच्या बायकोनं दुसरं लग्न केल्याचा राग अनावर, नमाज पठणासाठी गेलेल्या वसीमला रस्त्यात गाठलं अन्..., नागपूर हादरलं!
Embed widget