(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Rain : पुण्यात पावसाचं दमदार 'कमबॅक'; राज्यभर पावसाची स्थिती काय?
पुण्यात पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे. रात्रीपासून पावसाने चांगलंच पुनरागमन केलं आहे. पुणे, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागात पाऊस पडत आहे.
पुणे : पुण्यात (Monsoon update) पुन्हा एकदा पावसाने जोर (Weather forecast) धरला आहे. रात्रीपासून (maharashtra weather update) पावसाने चांगलंच पुनरागमन केलं आहे. पुणे, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागात पाऊस पडत आहे. महिनाभर पावसाने मोठा ब्रेक घेतल्यामुळे नागरिकांमध्ये आणि महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं. पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावल्यामुळे काही प्रमाणात शेतकरी सुखावला आहे.
पुण्यातील विविध भागात पाऊस
पुण्यातील बिबवेवाडी, कोथरुड, पेठ परिसर, एनआयबीएम, शिवाजीनगर, हडपसर आदी भागात शहरात मुसळधार पाऊस झाला, तर पुणे ग्रामीणमधील पिंपरी चिंचवडमधील मोशी आणि मावळ तालुक्यातही मुसळधार पाऊस झाल्याची नोंद आहे. आज सकाळी 9.05 वाजेपर्यंत शिवाजीनगरमध्ये 19 मिमी पावसाची नोंद झाली आहे, तर चिंचवडमध्ये 83.5 मिमी, मगरपट्टामध्ये 54 मिमी, लोहेगावमध्ये 31.8 मिमी आणि पाषाणमध्ये 12.2 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
लोणावळ्यातदेखील जोरदार पाऊस...
पुण्याच्या लोणावळ्यात पावसाने पुन्हा एकदा जोर धरला आहे. मध्यरात्रीत इथं पावसाने चांगलीच कृपादृष्टी दाखवली. तब्बल शंभर मिलिमीटर पाऊस कोसळला. गेली तीन आठवडे या पावसाची प्रतीक्षा स्थानिक व्यावसायिकांना होती. आता पुन्हा एकदा पर्यटक वर्षाविहाराचा आनंद घेण्यासाठी येतील आणि त्याचा व्यवसाय तेजीत येईल, अशी त्यांना अपेक्षा आहे. गेल्या वर्षीची आणि यंदाची तुलना केली तब्बल 777 मिमी पाऊस कमी बरसला आहे. गेल्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत 4583 मिमी पावसाने हजेरी लावली होती, यंदा मात्र 3806 मिमी पावसानेच कृपादृष्टी दाखवली. लोणावळालगतच्या पवना धरण क्षेत्रात मात्र केवळ 20 मिमी इतकंच पाऊस कोसळलं आहे. ही बाब शेतकऱ्यांच्या दृष्टीने चिंतेची आहे.
राज्यभर पावसाची शक्यता...
हवामान खात्याने सांगितल्यानुसार, ऑगस्ट कोरडा गेला असला तरी सप्टेंबर महिन्यात पावसाची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. त्यामुळे अरबी समुद्रातील मान्सूनची शाखा कोकणात पावसाची शक्यता आहे. त्यासोबतच विदर्भात देखील पावसाची शक्याता आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात देखील पावसाची शक्यता दर्शवण्यात आली आहे. हा पाऊस किती असेल आणि किती कालावधीसाठी असेल हे बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र कोणत्या दिशेने प्रवास करत यावर अवलंबून असेल. ऑगस्ट महिन्यात निर्माण झालेला पावसाचा बॅकलॉग सप्टेंबर महिन्यात भरुन निघेल का? हे आताच सांगता येणार नाही.
इतर महत्वाची बातमी-
IMD Weather Update : देशाच्या 'या' भागांत मान्सूनचे पुनरागमन; मेघगर्जनेसह पावसाची शक्यता