एक्स्प्लोर

Pune News : तरुणांनो जरा जपून! राजगडावर फिरण्यासाठी गेलेल्या 33 वर्षीय पर्यटकाचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू

राजगडावर फिरायला आलेल्या एका तरुणाचा राजगड किल्ल्यावरील पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

पुणे : राजगडावर फिरायला गेलेल्या एका तरुणाचा (Trek) राजगड किल्ल्यावरील पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू (Tourist Death) झाल्याची घटना घडली आहे. सलग सुट्ट्यांमुळे अनेक पर्यटकांचे पाय पर्यटन स्थळांकडे (Tourist Spot) वळले आहेत. त्यामुळे किल्ल्यावर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. मंगळवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडल्याचं समोर आलं आहे. अजय मोहनन कल्लामपारा (वय-33 रा. भिवंडी, ठाणे) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट लि. कंपनीत  काम करीत होता.

ठाण्यातील चार पर्यटक पुण्याजवळील राजगडावर ट्रेकसाठी गेले होते. रात्रीचा ट्रेक होता.रात्रीच्या सुमारास अजय जवळच असणाऱ्या पाण्याच्या टाकीतील पाणी काढण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्याचा तोल जाऊन तो पाण्यात पडला. मित्रांनी त्यांचा बराच वेळ शोध घेतला मात्र तो सापडला नाही शेवटी सकाळी तो पाण्याच्या टाकीत आढळून आला.

हरिचश्चंद्रगडावर एकाचा गारठून मृत्यू

काही दिवसांपूर्वी   हरिचश्चंद्रगडावर प्रचंड पाऊस आणि दाट धुक्यामधुन वाट चुकलेल्या एका पर्यटकाचा पावसात भिजल्याने गारठून मृत्यू झाला होता अनिल नाथाराव गिते ((वय 35) लोहगाव,पुणे) असे मृत्यू झालेल्या पर्यटकांचे नाव आहे.  हपुण्यातील लोहगाव भागातील अनिल गिते,अनिल आंबेकर,गोविंद आंबेकर,तुकाराम तिपाले,महादु भुतेकर,हरिओम बोरुडे हे सहा पर्यटक हरिश्चंद्रगडावर फिरण्यासाठी आले होते. मात्र मुसळधार पाऊस,घनदाट झाडी आणि रात्र झाल्याने ते सहाहीजण रस्ता भरकटले आणि वेगवेगळ्या दिशेने गेले,सतत कोसळणाऱ्या पावसामुळे त्यातीलच एका पर्यटकाचा भिजून मृत्यू झाला होता.
त्यांनी स्थानिक रहिवासी आणि वन्यजीव विभागाच्या कर्मच्याऱ्यांशी संपर्क केला आणि त्यांनी एकमेकांचा शोध घेण्यास सुरुवात केली असता त्यांना अनिल गिते हे मृतावस्थेत पडल्याचे दिसून आले होते. त्यानंतर त्यांनी अनिल गिते यांचा मृतदेह गडाच्या पायथ्याशी आणण्यात आला होता. दोन्ही घटनानंतर ट्रेकला जाताना काळजी घेण्याचं आवाहन दरवर्षी करण्यात येतं. 

ट्रेक करताना कोणती काळजी घ्याल...

-एकट्याने ट्रेकिंगला जाण्यापेक्षा एखाद्या संस्थेतून किंवा ग्रुपसोबत जाणे केव्हाही चांगले. 
-ट्रेकिंग गाईड सर्व ट्रेकिंग उपकरणे पुरवत असल्याची खात्री करा.
-ट्रेक करताना लवकर वाळणारे कपडे घाला.
-शक्यतो ट्रेकिंग शूज घाला.
-तुमचे गॅझेट पावसापासून सुरक्षित ठेवण्यासाठी 2 मोठ्या प्लास्टिकच्या पिशव्या घेऊन जा.
-रेन कोट बाळगायला विसरू नका.
-ट्रेकिंग दरम्यान हायड्रेटेड रहा.
-जंगल आणि चिखलातून फिरताना जळू तुमच्या पायांवर हल्ला करत असल्यास जळू ओढू नका.
-प्रथमोपचार किट वापरा किंवा डॉक्टरांना भेट द्या
-माहीत नसलेल्या मार्गाचा अवलंब करू नका.
- तुमच्या मार्गदर्शकाच्या सूचनांप्रमाणेच ट्रेक करा. 
-निसरड्या रस्त्यांवर चालताना काळजी घ्या. 
-वाटेत नदी-नाले ओलांडताना अतिसाहस करू नका. 
-नदी लहान असली तरी प्रवाहाच्या वेगामुळे वाहून जाण्याचा धोका असतो.
-फोटो काढण्यासाठी डोंगराच्या बाजूला किंवा तलावाजवळ जोखमीची पोझेस देऊ नका त्यामुळे तोल जाण्याची भीती असते.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Pune Crime News : पुणे हादरलं! मध्यरात्री भररस्त्यात घडला हत्येचा थरार; चित्रपट पाहून बाहेर पडताच हत्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pawan Kalyan Solapur Road Show : पवन कल्याण यांचा सोलापुरात भव्य रोड शो; नागरिकांची तोबा गर्दीSpecial Report Sharad Pawar : 'पवार'फुल खेळीची इनसाईड स्टोरी! 2014 सालची रणनीती काय होती?Special Report Mahayuti CM  Post : महायुतीच्या गोटात नेमकं काय सुरुय? पुढील मुख्यमंत्री कोण होणार?Special Report Pawar VS Dilip Walse Patil : 'गुरू'चा कोप, शिष्य भावूक; पवारांच्या टीकेवर वळसे काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
×
Embed widget