Pune Crime News : पुणे हादरलं! मध्यरात्री भररस्त्यात घडला हत्येचा थरार; चित्रपट पाहून बाहेर पडताच हत्या
पुण्यात चाकूने वार करत तरुणाचा दहा ते बारा जणांनी मिळून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Pune Crime news : पुण्यात चाकूने वार करत तरुणाची (Pune Crime News) दहा ते बारा जणांनी मिळून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना पुण्यातील मंगला टॉकीज (Mangla Talkies Pune) परिसरात 15 ऑगस्ट रोजी रात्री एक वाजताच्या सुमारास घडली आहे. चित्रपट पाहून बाहेर (Murder Case) पडताना या तरुणावर वार करण्यात आले आहेत. नितीन मस्के (Nitin Maske) असं हत्या करण्यात आलेल्या मुलाचं नाव आहे.
नितीन मस्के असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. नितीन चित्रपट गृहातून बाहेर पडला. त्यावेळी त्याच्यावर चाकुने वार करण्यात आले होते. यामध्ये नितीन मस्के याचा जागीच मृत्यू झाला आहे. तलवार, चाकू आणि लोखंडी रॉड अशी हत्यारे घेऊन दहा ते बारा जणांनी घेरून मस्के यांची हत्या केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन म्हस्के आणि काही मुलांचा वाद होता. हाच वाद कदाचित टोकाला गेला आणि त्यातूनच मध्यरात्री हा हत्येचा थरार रंगला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. चित्रपट गृहातून बाहेर पडल्यानंतर त्यांचा खून करण्यात आला आहे. नितीनच्या खूनानंतर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
शिवाजीनगर पोलिसांनी सागर कोळानट्टी ऊर्फ यल्ल्या (वय 32), मलिक कोळ्या ऊर्फ तुंड्या (वय 24), इम्रान शेख (वय 32), पंडित कांबळे (वय 27), विवेक नवधर ऊर्फ भोला (वय 24), लॉरेन्स पिल्ले (वय 33), सुशील सूर्यवंशी (वय 30), मनोज हावळे ऊर्फ बाबा (वय 25), आकाश गायकवाड ऊर्फ चड्डी (वय 24), रोहन ऊर्फ मच्छी मल्लेश तुपधर (वय 20), विवेक भोलेनाथ नवधरे (वय 27), अक्षय ऊर्फ बंटी साबळे (वय 21), विशाल भोले (वय 30, सर्व रा. ताडीवाला रोड) यांच्याविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांत तक्रार देणारे आणि मस्के हे दोघं गदर 2 चित्रपट पाहण्यासाठी मंगला चित्रपटगृहात आले होते. हे या टोळीला समजले. चित्रपट संपण्याची वाट पहात थांबले होते. चित्रपट सुटला आणि नितीन म्हस्के हा बाहेर आल्यावर लोकांच्या गर्दीत त्यांनी नितीनला घेरले. त्याच्या डोक्यात,मानेवर तलवार, पालघन, लोखंडी गज, काठ्या आणि फरशीच्या तुकड्यांनी सपासप वार केले. यात नितिनचा मृत्यू झाला. मध्यरात्री मंगला टॉकीजजवळ हा सगळा थरार रंगला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी स्वयंघोषित राष्ट्रसंत एकनाथ लोमटे महाराजाला अटक