एक्स्प्लोर
Advertisement
Ajit Pawar : अशी घेतली अजित पवारांनी शरद पवारांची गुप्त भेट, जाणून घ्या दिवसभरातील घटनाक्रम
Ajit Pawar Meet Sharad Pawar: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतल्याचं समोर आलं आहे.
पुणे: राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ माजवणारी घटना घडली असून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची (Sharad Pawar) गुप्त भेट घेतल्याचं समोर आलं आहे. अजित पवार यांनी उद्योगपती अतुल चोरडिया यांच्या कोरेगाव पार्कमधील बंगल्यावर ही भेट घेतली. यावेळी काका-पुतण्यामध्ये दीर्घ चर्चा झाल्याचं स्पष्ट झालं. महत्त्वाचं म्हणजे यावेळी जयंत पाटीलही उपस्थित होते. पवार काका-पुतण्याच्या भेटीनंतर आता राज्याच्या राजकारणात चांगलीच चर्चा रंगली आहे.
शरद पवार- अजित पवारांच्या भेटीचा घटनाक्रम
- अजित पवार हे पुण्यातील चांदणी चौकातील प्रकल्पाच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी अकरा वाजता चांदणी चौकात पोहचले.
- उद्घाटनाचा हा कार्यक्रम संपल्यानंतर अजित पवार हे नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस या यांच्यासोबत एनएचएआयच्या बैठकीस उपस्थित राहतील असं सांगण्यात आलं.
- दुसरीकडे शरद पवार हे जयंत पाटील यांच्यासह वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित एका बैठकीस अकरा वाजता उपस्थित राहिले.
- मात्र शरद पवार आणि जयंत पाटील हे साडेबारा वाजता वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची बैठक अर्धवट सोडून कोरेगाव पार्क भागातील अतुल चोरडिया यांच्या घरी पोहचले.
- तर इकडून अजित पवार चांदणी चौकातील कार्यक्रम आटोपताच गडकरी आणि फडणवीस यांच्यासोबतची पुढची बैठक टाळून अतुल चोरडिया यांच्या घरी पोहचले.
- दुपारी दीड वाजल्यापासून अतुल चोरडिया यांच्या घरी हे सर्वजण भेटले. संध्याकाळी पावणेपाच वाजता शरद पवार हे पुढच्या कार्यक्रमासाठी अतुल चोरडिया यांच्या घरातून बाहेर पडले.
- मात्र अजित पवार हे चोरडिया यांच्या घरातच बसून राहिले.
- यावेळी अतुल चोरडीया यांनी अजित पवार आणि शरद पवार हे भेटलेच नाहीत असा दावा एबीपी माझाशी बोलताना केला, जो पुढे खोटा ठरला.
- शरद पवारांसोबत आलेले जयंत पाटील हे 6:25 वाजता त्यांच्या काळ्या गाडीतून बाहेर पडले.
- सायंकाळी 6. 43 मिनिटांनी अजित पवार वापरत असलेली गाडी त्यांचा ड्रायव्हर एकटाच घेऊन बाहेर पडला. अजित पवार इथे नाहीतच असं दाखवण्याचा हा प्रयत्न होता.
- तर 6.45 वाजता अजित पवार दुसर्या गाडीतून लपून बाहेर पडले. यावेळी कॅमेरात येऊ नये म्हणून काळ्या रंगाच्या गाडीत अजित पवार सीटवर आडवे पडल्याचं दिसून आलं.
ही बातमी वाचा:
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भविष्य
निवडणूक
क्रिकेट
Advertisement