एक्स्प्लोर
हात धुतल्यावर लगेचच बोटाची शाई गेली

पुणे: पुण्यात मतदानानंतर हात धुतवर शाई पुसली जात असल्याचं समोर आलं आहे. पुण्याच्या शुक्रवार पेठेतील एका मतदान केंद्रावर बोटाला लावण्यात आलेली शाई, पाण्याने हात धुतला की लगेच निघून गेल्याचं दिसलं. शुक्रवार पेठेतील आदर्श विद्यालयामध्ये हे मतदान केंद्र आहे. प्राध्यापिका मंजुश्री जोशी यांनी आज सकाळी या मतदान केंद्रावर जाऊन मतदान केलं. त्यानंतर शाई लावलेलं बोट दाखवत त्यांनी सेल्फी काढला आणि फेसबुकवर पोस्ट केला. त्यानंतर त्यांनी घरी येऊन हात धुतला असता बोटाची शाई निघून गेली. ही गोष्ट निवडणूक अधिकाऱ्यांच्या ध्यानात आणून देण्यासाठी मंजुश्री जोशी पुन्हा मतदान केंद्रावर गेल्या. तेव्हा तिथे असलेल्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या बोटाला पुन्हा दुसऱ्या बाटलीतील शाई लावली. मात्र हात धुतला असता ती शाईदेखील निघून गेली. या मतदान केंद्रावर येणाऱ्या इतर मतदारांनाही हा अनुभव येतोय.
आणखी वाचा























