एक्स्प्लोर

Pune Crime news : वर्षाच्या सरतेशेवटी पुणे हादरलं! पुण्यात पंधरा वर्षीय मुलीवर सामूहिक लैंगिक अत्याचार; 6 जण अटकेत

Pune Crime news : अल्पवयीन मुलीवर सहा जणांनी सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने पुणे शहर पुन्हा हादरले आहे.

Pune Crime news : अल्पवयीन मुलीवर सहा जणांनी सामूहिक (Pune crime) बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने पुणे शहर पुन्हा हादरले आहे. आधी चाकूचा धाक दाखवून या मुलीचं अपहरण केलं आणि तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिचे नग्न अवस्थेतील फोटो काढून हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन सहा आरोपींनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. या प्रकरणी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे.

ओम राजु तिंबोळे (रा. जय गणेश कॉलनी, विधाते वस्ती, औंध), जय राजु तिंबोळे, अनिल जाधव, सुनिल जाधव, शुभम आणि किरण जावळे (सर्व रा. औंध) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. ही घटना विशालनगर येथील लॉजवर, बाणेर येथील तुकाई मंदिर टेकडी तसेच औंधमध्ये घडली. जुलै 2022 ते 23 डिसेबर 2022 दरम्यान घडली आहे. सहाही आरोपींवर पोलिसांनी पॉक्सोसह अनुसूचित जाती जमाती अधिनियमानुसार (अॅट्रॉसिटी) गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे सगळीकडे संताप व्यक्त केला जात आहे. 

फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन वेगवेगळ्या ठिकाणी बोलावून बलात्कार

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल जाधव या व्यक्तीने 15 वर्षीय मुलीला चाकूचा धाक दाखवला. मुलीला घाबरवलं आणि तिचं अपहरण केलं. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. तिचे नग्न अवस्थेतील फोटो काढून ते फोटो आपल्या मित्रांना पाठवले. त्यानंतर तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. तिला वेगवेगळ्या ठिकाणी बोलवून तिच्यावर अत्याचार केले. 23 डिसेंबर रोजी दुपारी तिला एका ठिकाणी बोलावून सहा जणांनी तिच्यवर सामूहिक बलात्कार केला. या बलात्कारानंतर मुलीला त्रास होऊ लागल्याने ही घटना आईच्या लक्षात आली. आईने थेट पोलिसांत धाव घेतली आणि पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार पोलिसांनी 6 जणांना अटक करण्यात आली आहे. 

नराधमांचा शेवट कधी?

पुण्यात रोज अत्याचाराच्या घटना समोर येत आहे. अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं चित्र आहे. दोन दिवासंपूर्वी एका प्रसिद्ध उद्योजकाने ऑडिशन घेण्याच्या बहाण्याने 13 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. पुण्यातील चाकण परिसरात ही घटना घडली होती. याप्रकरणी उद्योजकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात सगळीकडे संताप व्यक्त केला जात आहे. या नराधमांचा शेवट कधी होणार?, असा प्रश्न विचारला जात आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Agarwal Family Member Fight : अग्रवाल कुटुंबातील एकाची पत्रकारांना धक्काबूक्की, पाहा काय घडलं...ABP Majha Headlines : 11 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSina River Solapur : हे क्रिकेटचे मैदान नाही, महाराष्ट्रातील कोरडी नदी आहे Maharashtra ABP MajhaDombivli Blast 10 Videos : डोंबिवली बॉलयर ब्लास्टची भीषणता  दाखवणारी 10 भयानक दृश्य!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
Astrological Tips : अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Cyber Crime : हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
Embed widget