एक्स्प्लोर

Pune electricity : पुण्यात अचानक बत्ती गुल्ल; नागरिकांचे हाल,;अखेर पाच तासांनी वीजपुरवठा सुरळीत

पुण्यात पाच तास बत्ती गुल्ल झाली होती. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला. अखेर पाच तासांनी वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.

Pune power electricity : पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या (पीजीसीआयएल) 400 केव्ही शिक्रापूर ते तळेगाव अतिउच्चदाबाची एक वीजवाहिनी तुटल्याने  आज (दि. 8 जुलै) सकाळी 9 च्या सुमारास पिंपरी चिंचवड परिसर, शिक्रापूर, उर्से, थेऊर, पेरणे आदी परिसरातील ग्राहकांचा वीजपुरवठा बंद पडला होता. मात्र पावसामुळे विजेची मागणी कमी झाल्यामुळे तुटलेल्या अतिउच्चदाब वीजवाहिनीचा भार इतर वीजवाहिन्यांवर देण्यात आला आणि भारव्यवस्थापनाद्वारे या सर्वच भागात दुपारी 12: 45 वाजेपर्यंत टप्प्याटप्प्याने वीजपुरवठा सुरू करण्यात आला आहे.

पीजीसीआयएलच्या शिक्रापूर ते तळेगाव 400 केव्हीच्या अतिउच्चदाबाच्या चारपैकी एक वीजवाहिनी तळेगाव एमआयडीसीजवळ आज सकाळी 9 वाजता तुटली. त्यामुळे सुमारे 355 मेगावॅट विजेचे वहन ठप्प झाले होते. मात्र पावसामुळे विजेची मागणी कमी झाल्याने इतर वीजवाहिन्यांवर हा भार देत भारव्यवस्थापनाद्वारे पर्यायी स्वरुपात वीजपुरवठा सुरळीत करण्यात महावितरण व महापारेषणला यश आले. त्यामुळे बाधीत झालेल्या पिंपरी गाव, रहाटणी, पिंपळे सौदागर, काळेवाडी, चिंचवड गाव, वाल्हेकरवाडी, रावेत, देहू रोड, खराडी, जुना मुंढवा, थिटेवाडी, थेऊर, पेरणे, शिक्रापूर, कोरेगाव भिमा, सणसवाडी, कोरेगाव मूळ, रांजणगावचा काही भाग आदी परिसरातील वीजपुरवठा टप्प्याटप्प्याने दुपारी 12: 45 पर्यंत सुरु करण्यात आला. त्यामुळे वीजग्राहकांना मोठा दिलासा मिळाला.  

दरम्यान, पॉवर ग्रीडच्या तुटलेल्या अतिउच्चदाब वीजवाहिनीच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आज सायंकाळी या वीजवाहिनीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण होईल. त्यानंतर इतर वाहिन्यांवर देण्यात आलेला वीजभार या वाहिनीवर पूर्ववत देण्यात येईल, असं संबंधित अधिकाऱ्याकडून सांगण्यात आलं आहे. 

पाच तास वीजपुरवठा ठप्प

पॉवर ग्रीडच्या अतिउच्चदाब 400 केव्ही वीजवाहिनीच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर प्रयत्न सुरू होतं. मात्र त्यास सात ते आठ तास लागण्याची शक्यता असल्याचं सांगण्यात आलं होतं. दरम्यान महापारेषण आणि  महावितरणच्या संयुक्त प्रयत्नातून भारव्यवस्थापनाद्वारे पर्यायी स्वरुपात वीजपुरवठा उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरु होतं. तर काही ठिकाणी नाईलाजाने चक्राकार पद्धतीने भारनियमन करावे लागणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र पाच तासात वीजपुरवठा पुर्ववत करण्यात आला आहे. 

नागरिकांचे हाल...

सकाळी कामाच्यावेळी विजपुरवठा खंडित झाल्यामुळे अनेक नागरिकांना त्रास सहन करावा लागला. त्यामुळे काही परिसरातील नागरीक चांगलेच संतापले होते. त्यानंतर पाच तासांनी विजपुरवठा सुरळीत करण्यात आला. 

हेही वाचा-

Pune school Bus News : चालक अन् केअर टेकरचा हलगर्जीपणा, चार वर्षाची चिमुकली स्कूल बसमध्ये झोपली अन्...;नेमकं काय घडलं?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

स्वार्थासाठी कुठल्याही थराला जाणारी ही राजकारणातील कीड, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल, म्हणाले राज्यात द्वेष पसरवणारे हेच 
स्वार्थासाठी कुठल्याही थराला जाणारी ही राजकारणातील कीड, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल, म्हणाले राज्यात द्वेष पसरवणारे हेच 
सुटकेसमध्ये महिलेचं मुंडकं, गोणीतील धड शोधलं; मांडवी पोलिसांनी उलगडला हत्याकांडाचं गुढ, नवऱ्याला अटक
सुटकेसमध्ये महिलेचं मुंडकं, गोणीतील धड शोधलं; मांडवी पोलिसांनी उलगडला हत्याकांडाचं गुढ, नवऱ्याला अटक
नागपूर, संभाजीनगरमध्ये अधिकारी बदलले; राज्यात 6 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, आंचल गोयल मुंबईच्या जिल्हाधिकारी
नागपूर, संभाजीनगरमध्ये अधिकारी बदलले; राज्यात 6 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, आंचल गोयल मुंबईच्या जिल्हाधिकारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 मार्च 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 मार्च 2025 | मंगळवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prashant Koratkar Lawyer PC : जामीन अर्ज फेटाळला, कोणत्याही क्षणी प्रशांत कोरटकरला अटक होणारABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 18 March 2025Superfast News Nagpur : नागपूरमध्ये दोन गटात राडा, आज तणावपूर्ण शांतता, पाहुया सुपरफास्ट न्यूजABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 18 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
स्वार्थासाठी कुठल्याही थराला जाणारी ही राजकारणातील कीड, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल, म्हणाले राज्यात द्वेष पसरवणारे हेच 
स्वार्थासाठी कुठल्याही थराला जाणारी ही राजकारणातील कीड, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल, म्हणाले राज्यात द्वेष पसरवणारे हेच 
सुटकेसमध्ये महिलेचं मुंडकं, गोणीतील धड शोधलं; मांडवी पोलिसांनी उलगडला हत्याकांडाचं गुढ, नवऱ्याला अटक
सुटकेसमध्ये महिलेचं मुंडकं, गोणीतील धड शोधलं; मांडवी पोलिसांनी उलगडला हत्याकांडाचं गुढ, नवऱ्याला अटक
नागपूर, संभाजीनगरमध्ये अधिकारी बदलले; राज्यात 6 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, आंचल गोयल मुंबईच्या जिल्हाधिकारी
नागपूर, संभाजीनगरमध्ये अधिकारी बदलले; राज्यात 6 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, आंचल गोयल मुंबईच्या जिल्हाधिकारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 मार्च 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 मार्च 2025 | मंगळवार
Nitesh Rane : मी मुख्यमंत्र्यांचा लाडका मंत्री, देवेंद्र फडणवीस मला कशाला तंबी देतील?; मंत्री नितेश राणेंची स्पष्टोक्ती, म्हणाले..
मी मुख्यमंत्र्यांचा लाडका मंत्री, देवेंद्र फडणवीस मला कशाला तंबी देतील?; मंत्री नितेश राणेंची स्पष्टोक्ती, म्हणाले..
मोठी बातमी! मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक होणार, बोगस मतदानाला आळा बसणार; दिल्लीत निर्णय
मोठी बातमी! मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक होणार, बोगस मतदानाला आळा बसणार; दिल्लीत निर्णय
Video: दीडशेंच्या जमावाने घेरले, लाठ्या,काठ्या अन् धारदार शस्त्रे; कुऱ्हाडीचे वार झेललेल्या DCP कदम यांचा थरारक अनुभव
Video: दीडशेंच्या जमावाने घेरले, लाठ्या,काठ्या अन् धारदार शस्त्रे; कुऱ्हाडीचे वार झेललेल्या DCP कदम यांचा थरारक अनुभव
नागपूर घटनेवर MIM प्रमुख असदुद्दीन औवेसींची पहिली प्रतिक्रिया; दोन मंत्र्यांवर निशाणा, इंटेलिजन्सही लक्ष्य
नागपूर घटनेवर MIM प्रमुख असदुद्दीन औवेसींची पहिली प्रतिक्रिया; दोन मंत्र्यांवर निशाणा, इंटेलिजन्सही लक्ष्य
Embed widget