एक्स्प्लोर

Pune ATS News : पुणे पोलिसांचं दहशतवाद्यांना पकडतानाचे CCTV फुटेज समोर, 18 तारखेला नेमकं काय घडलं?

पुणे पोलिसांचा दहशतवाद्यांना पकडतानाचा सीसीटीव्ही समोर आला आहे. 18 जुलैच्या पहाटे कोथरूड पोलिसांनी ज्या वेळेला या दहशतवाद्यांना पकडले त्या घटनेचा सीसीटीव्ही समोर आला आहे.

Pune ATSNIA Raids : पुणे पोलिसांचा दहशतवाद्यांना पकडतानाचा सीसीटीव्ही समोर (maharashtra ATS, NIA module) आला आहे. 18 जुलैच्या पहाटे कोथरूड पोलिसांनी ज्या वेळेला तीन दहशतवाद्यांना पकडले त्या घटनेचा सीसीटीव्ही समोर आला आहे. कोथरूडमध्ये पकडलेले जे तीन दहशतवादी होते त्यांना त्यांच्या निवासस्थानी ज्यावेळी नेण्यात आले त्यावेळी त्या तिघांनीही पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलीस आणि त्यांच्यात झालेल्या धरपकडीचा हा व्हिडीओ आहे. 

यावेळी मोहम्मद इम्रान खान, मोहम्मद युनूस साकी आणि शाहनवाज हे तिघे ही पोलिसांच्या ताब्यात होते मात्र कोंढवा परिसरात शाहनवाजने पळ काढला. याच वेळी साकी हा देखील पळण्याच्या प्रयत्नात होता मात्र त्याला पोलिसांनी पकडले. सीसीटीव्हीमध्ये असणारा दहशतवादी हा मोहम्मद युनूस साकी असून कोंढवा भागात पोलिसांना गुंगारा देत पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र बाला रफिक शेख या पोलिस अधिकाऱ्याने साकिला पकडून ठेवले आणि जेरबंद केलं. पुण्यातील कोंढवा परिसरात हे सगळे राहत होते. 15 महिन्यांपासून त्यांचं तिथे वास्तव्य होतं. NIA आणि ATS यांनी पकडलेले सगळे एकमेकांच्या संपर्कात असल्याचंदेखील आता समोर आलं आहे. 

18 तारखेला नेमकं काय घडलं?

कोथरुड येथे पोलीस पेट्रोलिंग पथक प्रदीप चव्हाण आणि अमोल नाझन हे पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी तीन दुचाकी चोरांना पकडले. या चोरांनी आजपर्यंत चोरी केलेला मुद्देमाल जप्त करण्यासाठी या तीन आरोपींना ते राहत असलेल्या ठिकाणी नेण्यात आले. त्या वेळी तिन्ही आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न करु केला मात्र एक आरोपी पळून जण्यात सफल झाला तर दोन आरोपी इमरान शेख आणि मोहमद यूनुस साकी यांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपीच्या घराची झडती घेतली असता घरातून एक जिवंत काडतूस आणि चार मोबाईल आणि लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे. मरान शेख आणि मोहमद यूनुस साकी यांना चोरीच्या गुन्ह्यात पकडण्यात आलं होतं. संपूर्ण चौकशी केली असता. त्यांनी देशविरोधी कृत्य केल्याचं समोर आलं. त्यातच हे प्रकरण नंतर एनआयएकडे पुढील तपासासाठी देण्यात आले आणि तपासादरम्यान युनुस साकी आणि इम्रान खान या दोघांची नावं समोर आली. हे दोन्ही आरोपी एनआयएच्या याच प्रकरणात वॉन्टेड आरोपी होते. त्यांना पकडून देणाऱ्यांना NIA कडून पाच लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं. 

 

हेही वाचा-

महाराष्ट्रातून एटीएसने घातपाती कारवायांचा कट उधळला, 15 ऑगस्टला देशात घातपाताचा होता कट

 
 
 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kirit Somaiya : बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
Thane : पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Working HOur Special Report :  90  तासांचा कल्ला, सोशल मिडियावरुन हल्ला50 Years of Wankhede| वानखेडेचा पर्यटनस्थळ म्हणून विकास होईल का? काय आहेत MCA चे फ्युचर प्लॅन्स?Rajkiya Shole on BJP Shivsena : ठाकरे खरंच भाजपशी जवळीकीचा प्रयत्न करतायत? Special ReportRajkiya Shole on MVA Spilt : मविआतील फुटीच्या चर्चेवरुन काय म्हणाले संजय राऊत? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kirit Somaiya : बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
Thane : पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
Amit Shah : शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
IND vs ENG : ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेलं 5 मोठे मुद्दे
ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेले 5 मोठे मुद्दे
भुजबळांचा सल्ला घेण्याची गरज वाटली नाही, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं  
भुजबळांचा सल्ला घेण्याची गरज वाटली नाही, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं  
Embed widget