एक्स्प्लोर

Pune news : पंक्चर डंपरला भरधाव कारची धडक, कार पेटली; फायरमन हेल्मेटनं काच फोडली अन् महिलेचा जीव वाचवला

नगर - पुणे रोडवर आगाखान पॅलेससमोर उभ्या असलेल्या पंक्चर डंपरला भरधाव आलिशान कारने पाठीमागून दिलेल्या धडकेत कारणे पेट घेतल्याची घटना घडली आहे.

Pune news : नगर - पुणे रोडवर आगाखान पॅलेससमोर  (Pune Accident News)  उभ्या असलेल्या पंक्चर डंपरला भरधाव आलिशान कारने पाठीमागून दिलेल्या धडकेत कारने पेट घेतल्याची घटना घडली आहे. एका फायरमनने आपल्या हेल्मेटने गाडीची काच फोडून आतील चालक महिलेला बाहेर काढून तिचा जीव वाचवला. अग्निशामन दलाने तातडीन घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले. ही घटना आगाखान पॅलेस समोर आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. 

अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, नगर पुणे रोडवर आगाखान पॅलेससमोर एका मालवाहू डंपर पंक्चर झाल्याने उभा होता. नगर रोडने एका आलिशान कारमधून एक महिला भरधाव येत होती. तिने वाटेत एक दोन मोटार सायकलचालकांना धडक दिली. त्यानंतर तिने या डंपरला पाठीमागून धडक दिली. धडक इतकी जोरात होती, कारने पेट घेतला. या चालक महिलेला बाहेर पडता येत नव्हते. 

त्याचवेळी तेथून जाणाऱ्या एका प्रशिक्षित फायरमन जवानाने हेल्मेटने चालकांकडील काच फोडली व या महिलेला बाहेर काढले. त्यावेळी ही महिला जवळपास बेशुद्धावस्थेत होती. तोपर्यंत 1 रुग्णवाहिका आली. डॉक्टरांनी तिला तपासले. तेव्हा तिचा रक्तदाब कमी झाल्याचं आढळून आलं. त्यांनी तातडीने तिला रुग्णालयात नेले. या घटनेच्या समोरच असलेल्या शांतीवन सॉफ्टवेअर हब असलेल्या कंपनीच्या सुरक्षा रक्षकांनी कंपनीची अग्निशमन यंत्रणा वापरुन आग विझविण्याचा प्रयत्न केला. 

दरम्यान, अग्निशमन दलाने वेळेत पोहचून आग पूर्णपणे विझविली, अशी माहिती अग्निशमन दलाचे कार्यप्रभारी अधिकारी सोपान पवार यांनी दिली. चालक सचिन वाघमारे, फायरमन सचिन जौजळे, संजय कारले, राहुल वडेकर, शरद दराडे आणि अक्षय केदारी यांनी ही आग विझविली.

अग्निशमन दलाचे जवान कायम तत्पर...

पुण्यातील अग्निशमन दलाच्या जवानांनी कायमच उत्तम कामगिरी बजावली आहे. दोनच दिवसांपूर्वी पुण्यातील अग्निशमन दलातील जवान हर्षद येवले यांनी देखील कुटुंबियांना जत्रेला घेऊन जात असताना रस्त्यावर पेट घेत असलेली गाडी पाहिली आणि जीवाची तमा न बाळगता कुटुंबियांना सोबत घेत गाडीची आग विझवली होती. त्यांनी कुटुंबीय सोबत असताना आणि महत्त्वाचं म्हणजे सुट्टीवर असताना केलेल्या कामाचे सर्वत्र कौतुक  झालं होतं.  पुण्यातील उंड्री परिसरात मंगळवारी (11 एप्रिल) रात्री एका चालत्या बीएमडब्ल्यू कारने अचानक पेट घेतला. त्यावेळी ऑफ-ड्युटी असलेला अग्निशमन दलाचा जवान मदतीसाठी आला. पेटलेली गाडी पाहून त्यांनी तत्परतेने आगीच्या दिशेने धाव घेत गाडीत कोणी अडकले आहे का याची प्रथम पाहणी केली. मग धर्मावत पेट्रोल पंप येथील अग्निरोधक उपकरण वापरुन बीएमडब्ल्यु-एक्सवन या पेटलेल्या वाहनाची प्राथमिक स्वरुपात आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला होता. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Singer Javed Ali Struggle Story ::  स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Mumbai Rain: मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Singer Javed Ali Struggle Story ::  स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Mumbai Rain: मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
Embed widget