एक्स्प्लोर
कोल्हापुरात शाहरुखच्या ‘रईस’विरोधात गांधीगिरी, झेंडूची फुले देऊन आंदोलन
![कोल्हापुरात शाहरुखच्या ‘रईस’विरोधात गांधीगिरी, झेंडूची फुले देऊन आंदोलन Protest Against Raees Film In Kolhapur कोल्हापुरात शाहरुखच्या ‘रईस’विरोधात गांधीगिरी, झेंडूची फुले देऊन आंदोलन](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/01/25120955/kolh-raees2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
कोल्हापूर : अभिनेता शाहरुख खानच्या ‘रईस’ सिनेमाविरोधात कोल्हापुरात गांधीगिरी स्टाईलने आंदोलन करण्यात आलं. क्षत्रिय मराठा रियासत फाऊंडेशनने सिनेमा पाहायला येणाऱ्यांना झेंडूची फुले देत शाहरुख खानचा निषेध नोंदवला आहे.
कोल्हापुरातील पद्मा चित्रपटगृहाबाहेर क्षत्रिय मराठा रियासत फाऊंडेशनने शाहरुखविरोधात घोषणा निषेध नोंदवला. मात्र, निषेधाची स्टाईल गांधीगिरीची होती. ‘रईस’ सिनेमा पाहायला येणाऱ्या प्रेक्षकांना झेंडूची फुले देत सिनेमा न पाहण्याचं आवाहन केलं.
दरम्यान, या आंदोलनानंतर ‘पद्मा’ चित्रपटगृहाने शाहरुख खानच्या ‘रईस’ सिनेमाचा आताचा शो रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
अभिनेता शाहरुख खान याचा बहुप्रतीक्षित ‘रईस’ सिनेमा आज प्रदर्शित झाला आहे.
Movie Reviews : रईस
“शाहरुख पाकिस्तानच्या बाजूने विधानं करतो. पाकिस्तानला आर्थिक मदत करतो. पाकिस्तानी खेळाडूंना सिनेमांमध्ये स्थान देतो.” असा आरोप करत क्षत्रिय मराठा रियासत फाऊंडेशनने सिनेमाला विरोध केला आहे.![Raees](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/01/25120958/Raees1-580x395.jpg)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
महाराष्ट्र
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)