एक्स्प्लोर
मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार, विखे-पाटलांचा इशारा
मुंबई : विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत खोटी माहिती दिल्याचा दावा करत सोमवारी ते हक्कभंग दाखल करणार आहेत.
विरोधी पक्षाने कॅबिनेट मंत्री संभाजी निलंगेकर यांच्यावर बँकेची फसवणूक केल्याचा आरोप केला होता. याबाबत खुलासा करताना मुख्यमंत्र्यांनी खोटी माहिती देत मंत्र्यांना पाठीशी घातल्याचा आरोप विखे-पाटील यांनी केला आहे.
संभाजी निलंगेकर यांच्याविरोधात न्यायालयात याचिकाही दाखल करणार असल्याचं विखे म्हणाले. सीबीआयने संभाजी निलंगेकर यांच्याविरोधात चार्जशीट दाखल केली आहे, त्यामुळे विखे सीबीआयच्या अधिकाऱ्यांचीही भेट घेणार आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement