एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
खासगी वाहनचालकानं एसटी वाहकाच्या श्रीमुखात भडकावली, बीडमध्ये एसटी कर्मचाऱ्यांचा रास्तारोको
खासगी वाहनचालकांनं एसटी वाहकाच्या श्रीमुखात भडकावली. या प्रकारामुळे माजलगाव डेपोतील सर्वच वाहक, चालक एकत्र येऊन त्यांनी शिवाजी चौकात बस रस्त्यावर लावून रास्तारोको सुरु केला.
बीड : आपली गाडी भरायच्या अगोदरच बस निघाल्याने आपल्याला प्रवासी मिळाले नाही. यामुळे संतापलेल्या अवैध वाहनचालकांने दुचाकी आडवी लावून बसच्या वाहक, चालकाला मारहाण केल्याचा प्रकार बीडमधील माजलगावातून समोर आला आहे. या सर्व प्रकरामुळे अवैध वाहनचालकांविरुद्ध डेपोतील वाहक, चालकांनी एकत्र येत माजलगावात रस्त्यावर बस आडव्या लावून दीड तास रास्तारोको आंदोलन केले.
माजलगाव बसस्थानाकातून आनंदगावला जाणारी गाडी बाहेर पडली असता रस्त्यात एका दुचाकीस्वाराने आडवी दुचाकी आडवी लावली होती. बस वाहकाने हॉर्न वाजावून त्याला बाजूला होण्याची विनंती केली पण तो बाजूला झाला नाही. दुचाकीस्वार गाडी बाजूला घेत नसल्याने पाहून वाहक सुमंत वाघ यांनी गाडीखाली उतरुन दुचाकीस्वाराला गाडी बाजूला घेण्याची विनंती केली.
वाहक सुमंत वाघ विनंती करीत असताना दुचाकीस्वाराने वाघ यांच्या श्रीमुखात भडकावली. त्यानंतर बसचे चालक नवनाथ मुंडे तात्काळ खाली उतरुन गेले. पण उद्दाम दुचाकीस्वाराने मुंडे यांचेही कपडे फाडून धक्काबुक्की केली. या प्रकारामुळे डेपोतील सर्वच वाहक, चालक एकत्र येऊन त्यांनी शिवाजी चौकात बस रस्त्यावर लावून रास्तारोको सुरू केला आहे.
शिवाजी चौकात हा प्रकार जवळपास एक ते दिड तास सुरु होता. यामुळे परिसरात मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी देखील झाली होती. पण डेपोतील वाहक, चालकांनी दुचाकीस्वारावर कारवाई किंवा अटक केल्याशिवाय गाड्या काढणार नसल्याचा पवित्रा घेतला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
बातम्या
करमणूक
Advertisement