एक्स्प्लोर
Advertisement
महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदी, ममता दीदींच्या मराठीतून शुभेच्छा
महाराष्ट्र दिनानिमित्त आज राज्यभरात वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. याचवेळी अनेक सेलिब्रिटींनी ट्विटरवरुन मराठीत महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
मुंबई : महाराष्ट्र दिनानिमित्त आज राज्यभरात वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. याचवेळी अनेक सेलिब्रिटींनी ट्विटरवरुन मराठीत महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनेही महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ‘महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! जय महाराष्ट्र’ असं म्हणत सचिननं शुभेच्छा दिल्या आहेत.
सचिनच्या याच ट्विटला कोट करत माजी क्रिकेटर आणि सचिनचा बालमित्र विनोद कांबळीनेही सचिनला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! जय महाराष्ट्र ???? #MaharashtraDay pic.twitter.com/EUnZ5x2XEr
— Sachin Tendulkar (@sachin_rt) May 1, 2018
सचिन आणि विनोद कांबळीशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही महाराष्ट्र दिनाच्या मराठीत शुभेच्छा दिल्या आहेत.Tumhala he???? https://t.co/Wa32EQJa2w
— VINOD KAMBLI (@vinodkambli349) May 1, 2018
‘महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा ! महाराष्ट्राच्या निरंतर प्रगती आणि समृद्धीसाठी मी प्रार्थना करतो. हे राज्य प्रगतीच्या नव्या उंचीवर पोहोचावे आणि देशाच्या विकासाच्या प्रवासात त्याचे योगदान असेच वाढत जावे.’ अशा शब्दात पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा ! महाराष्ट्राच्या निरंतर प्रगती आणि समृद्धीसाठी मी प्रार्थना करतो. हे राज्य प्रगतीच्या नव्या उंचीवर पोहोचावे आणि देशाच्या विकासाच्या प्रवासात त्याचे योगदान असेच वाढत जावे.
— Narendra Modi (@narendramodi) May 1, 2018
‘महाराष्ट्र दिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील माझ्या सर्व भाऊ-बहिणींना शुभेच्छा’ तर प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही मराठीतून शुभेच्छा दिल्या आहेत. दुसरीकडे महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबईतील शिवाजी पार्क मैदानात राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. तर महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर एस टी महामंडळातर्फे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजनेची सुरुवात झाली. या अंतर्गत शहीद जवानांच्या वीर पत्नींना एसटीचा आजीवन मोफत पास राज्यपालांच्या हस्ते वितरीत करण्यात आला.Greetings to all my brothers and sisters in Maharashtra on the occasion of Maharashtra Divas
महाराष्ट्र दिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील माझ्या सर्व भाऊ-बहिणींना शुभेच्छा — Mamata Banerjee (@MamataOfficial) May 1, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
राजकारण
बॉलीवूड
बातम्या
Advertisement