President Raigad Visit : राष्ट्रपती उद्या रायगडावर; कडेकोट बंदोबस्त, अशी असेल व्यवस्था...
President Ramnath Kovind Raigad Visit : राष्ट्रपती रामनाथ कोविंद उद्या म्हणजेच सहा डिसेंबरला रायगड किल्ल्याला भेट देणार आहेत.
President Ramnath Kovind Raigad Visit : राष्ट्रपती रामनाथ कोविंद ( President Ramnath Kovind) उद्या म्हणजेच सहा डिसेंबरला रायगड किल्ल्याला (Raigad Fort) भेट देणार आहेत. राष्ट्रपती हेलिकॉप्टरने होळीच्या माळावर उतरणार होते. मात्र याला शिवप्रेमींनी तीव्र विरोध दर्शवल्यानंतर राष्ट्रपती रोप-वेने रायगडावर येणार आहेत. राष्ट्रपतींच्या दौऱ्यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरु आहे. खासदार संभाजी छत्रपती ( Sambhaji Chhatrapati) यांनी राष्ट्रपती कोविंद यांना रायगड भेटीचं निमंत्रण दिलं होतं.
सुरक्षेसाठी चोख बंदोबस्त तैनात
दरम्यान त्यांच्या या दौऱ्यावेळी आजूबाजूच्या परिसरामध्ये पर्यटकांना प्रवेश नाकारण्यात येणार आहे. पर्यटकांना आजूबाजूच्या परिसरातही प्रवेश नाकारण्यात येणार आहे. पर्यटकांसाठीची रोप-वेची सुविधाही बंद ठेवण्यात आली आहे. प्रशासनानं पर्यटकांची गैरसोय टाळण्यासाठी आधीच याबाबतचे आदेश जारी केले होते. राष्ट्रपतींच्या भेटीसाठी रायगडावर लगबग सुरु आहे. संभाजीराजे छत्रपती यांच्या पत्नी युवराज्ञी संयोगीताराजे छत्रपती यांनी रायगड किल्ल्यावरील तयारीची पाहणी केली.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद हेलिकॉप्टरने होळीच्या माळावर उतरणार होते. त्यासाठी हेलिपॅडही तयार करण्यात आला होता. उडत असल्याने 25 वर्षांपूर्वी किल्ले रायगडावरील होळीच्या माळावर हेलिपॅड होते. मात्र हॅलिकॉप्टर उतरताना किंवा उड्डाण घेताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर मोठ्या प्रमाणात धूळ आणि माती उडायची. त्यामुळे शिवप्रेमींनी 1996 साली उपोषण केले. त्यानंतर हा हेलिपॅड काढून टाकण्यात आला होता.
महत्त्वाच्या बातम्या :
- Omicron: चिंता वाढली! राजधानी दिल्लीत ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण, देशातील रुग्णसंख्या पाचवर
- Wifi Router : तुमचा वायफाय राऊटर धोक्यात?, 'या' कंपन्यांची नावं हॅकर्सच्या यादीत
- Trending News : उतावळी नवरी...'या' महिलेला लग्नाचं व्यसन, आतापर्यंत 11 वेळा शुभमंगल
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha