Trending News : उतावळी नवरी...'या' महिलेला लग्नाचं व्यसन, आतापर्यंत 11 वेळा शुभमंगल
Trending News : तुम्ही कधी 11 लग्नांबद्दल ऐकले आहे का? नसेल तर ही बातमी नक्की वाचा. एका महिलेला साधंसुध नाही तर चक्क लग्नाचं व्यसन आहे.
Trending News : तुम्ही कधी 11 लग्नांबद्दल ऐकले आहे का? नसेल तर ही बातमी नक्की वाचा. एका महिलेला साधंसुध नाही तर चक्क लग्नाचं व्यसन आहे. ही 52 वर्षीय महिला आता तिच्या 12 व्या लग्नाच्या तयारीत आहे.
लग्न हे सात जन्माचं नातं असतं हे आजपर्यंत तुम्ही ऐकलं असेल. असा विचार करून लोकं नातं आयुष्यभर जपायचे. बदलत्या काळानुसार आणि नात्यांमधील संघर्ष, घटस्फोट आणि पुनर्विवाह आता सामान्य झाले आहेत. काही प्रकरणांमध्ये एका व्यक्तीने 3-4 लग्न केल्याचे तुम्ही ऐकले असेल, परंतु तुम्ही कधी 11 लग्नांबद्दल ऐकले आहे. नसेल तर ही बातमी नक्की वाचा. आम्ही तुम्हाला अशा एका महिलेची ओळख करून देणार आहोत जिला लग्नाचे व्यसन आहे. या 52 वर्षीय महिलेने आतापर्यंत 11 लग्न केले असून ती 12वं लग्न करण्याची तयारी करत आहे.
कोण आहे 'ही' महिला ?
मोनेट डायस नावाची ही महिला अमेरिकेतील उटाह (UTAH) मध्ये राहते. अलीकडेच तीची एका मुलाखत प्रसिद्ध झाली. या शोमध्ये या 52 वर्षीय महिन्याने तिच्या लग्नांबद्दल तपशीलवार माहिती दिली. तिने सांगितले की, तिने 11 वेळा लग्न केले आहे आणि आता ती 12वं लग्न करण्याचा विचार करत आहे. मोनेट म्हणते की, ''मी पटकन प्रेमात पडते. आतापर्यंत मला सुमारे 28 वेळा प्रपोज करण्यात आलं आहे.'' लग्नानंतर मोनेटला साथीदाराबरोबरचे संबंध चांगले वाटत नाहीत, तेव्हा ती नवीन नात्याच्या शोधात निघून जाते.
सर्व पतींची नावे लक्षात
मोनेटला सर्व 11 पतींची नावं लक्षात आहेत का असा प्रश्न विचारला असता तिनं उत्तर दिली की, ''माझ्या कुटुंबातील सदस्यांना माझ्या सर्व पतींची नावे आठवत नाहीत. पण मला माझ्या सर्व पतींची नावे आठवतात.'' यानंतर तिने सर्व पतींची नावे क्रमवार सांगितली.
मोनेट डायस सांगते की, या सगळ्यांपैकी जे लग्न सर्वात जास्त काळ टिकलं ते 10 वर्षांचं होतं. तर सर्वात कमी काळ टिकलेलं लग्न केवळ 6 आठवड्यांचं होतं. 11 लग्नानंतर आता मोनेट 12 व्या लग्नासाठी सज्ज झाली आहे. त्यांनी यासाठी जॉन नावाच्या 57 वर्षीय व्यक्तीची निवड केली आहे. जॉनचा दोन वेळा घटस्फोट झाला आहे. यावेळी त्यांचे लग्न जास्त काळ टिकेल असे त्यांना वाटते.
महत्त्वाच्या बातम्या :
- Wifi Router : तुमचा वायफाय राऊटर धोक्यात?, 'या' कंपन्यांची नावं हॅकर्सच्या यादीत
- Petrol Diesel Price Today : पेट्रोल-डिझेलचे आजचे दर, सर्वसामान्यांना दिलासा कायम
- Katrina Kaif And Vicky Kaushal Wedding : टीम इंडियाच्या 'या' खेळाडूला कतरिना आणि विकीच्या लग्नाचं आमंत्रण
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha