एक्स्प्लोर
अहमदनगरमध्ये गर्भवतीचा मृत्यू, डॉक्टरच्या हलगर्जीपणाचा नातेवाईकांचा आरोप
![अहमदनगरमध्ये गर्भवतीचा मृत्यू, डॉक्टरच्या हलगर्जीपणाचा नातेवाईकांचा आरोप Pregnant Woman Dies In Hospital In Ahmednagar Latest Updates अहमदनगरमध्ये गर्भवतीचा मृत्यू, डॉक्टरच्या हलगर्जीपणाचा नातेवाईकांचा आरोप](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/11/21112930/Ahamadnagar-compressed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
अहमदनगर : अहमदनगरमध्ये गर्भवती महिलेचा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. महिलेच्या मृत्यूनंतर डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे. श्रावणी निकम असं या मृत्यू झालेल्या गर्भवती महिलेचं नाव आहे.
अहमदनगर महापालिकेच्या बाळासाहेब देशपांडे रुग्णालयात श्रावणी निकम ही गर्भवती महिला दाखल झाली होती. मात्र आज तिचा मृत्यू झाला आहे. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. तसंच रुग्णालयाच्या परिसरात नातेवाईकांनी मोठी गर्दी केली आहे.
सुरक्षेच्या कारणामुळे पोलिसांनी रुग्णालयात बंदोबस्त तैनात केला आहे. तसंच संबंधित डॉक्टरला ताब्यात घेतलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
भारत
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)