मुख्यमंत्री आणि राज ठाकरेंच्या भेटीत नेमकं काय घडलं? कोणत्या विषयावर झाली चर्चा? फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
मुंबईत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

CM Devendra Fadnavis : मुंबईत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. मनसे भाजप यांची युती होणार का? अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी विधानरिषदेवर पाठवलं जाणार? अशा चर्चा सुरु आहेत. याबाबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आमची कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. केवळ मैत्रीकरता मी त्यांच्या घरी गेलो होतो, असे फडणवीस म्हणाले.
नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?
आमची कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर राज ठाकरेंचा मला अभिनंदनाचा फोन आला होता. त्यावेळी मी त्यांना सांगितले होते की, मी घरी येईल. त्यानुसार आज मी त्यांच्या घरी गेलो होतो असे फडणवीस म्हणाले. त्यांच्या घरी ब्रेकफास्ट केला, त्यांच्याशी गप्पा मारल्याचे फडणवीस म्हणाले. या भेटीचा कोणताही राजकीय संदर्भ नाही. केवळ मैत्रीकरता मी त्यांच्या घरी गेलो होतो असेही फडणवीस म्हणाले. युतीसंदर्भात कोणतीही चर्चा यावेळी झाली नसल्याचे फडणवीस म्हणाले. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या समितीतून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव वगळ्यात आल्याच्या चर्चा आहेत, याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी विचारले असता, ते म्हणाले की, असं कसं होणार आहे? काहाही नवीन चर्चा होते? अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
ही भेट महापालिका निवडणुकीसाठी असू शकते, सुषमा अंधारेंची टीका
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. या दोन्ही नेत्यांमध्ये बराच वेळ चर्चा झाल्याची माहिती आहे. परिणामी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने या दोन दिग्गज नेत्यांच्या अचानक भेटीमुळे अनेक चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान, शिवसेना उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे(सुषमा अंधारे) यांनी राज ठाकरेंचा राजकीय वावर संपत चालला आहे. राज ठाकरे अनेकदा भाजप विरोधात भूमिका घेतात पण निवडणुका जवळ आल्या की भाजप सोबत जवळीक साधताना दिसतात. ही भेट महापालिका निवडणुकीसाठी असू शकते असं अंधारे यांनी म्हटलं आहे. दरम्यान, या भेटीनंतर मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट ॲंड गाईड हाॅलमधील शिवाजी पार्कमध्ये परीक्षा पे चर्चा या पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कार्यक्रमाला उपस्थितीत होते.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

