Amit Thackeray : आता भाजपला घराणेशाही दिसत नाही का? अमित ठाकरे आमदार होण्याचे संकेत मिळताच काँग्रेसचा सवाल
Amit Thackeray : राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना राज्यपाल नामनियुक्त आमदार म्हणून विधानपरिषदेवर पाठवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबई : राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका झाल्यानंतर आता महापालिका निवडणुकांचे वेध लागले आहेत. सध्या सर्वच राजकीय पक्षांकडून महापालिका निवडणुकांसाठी तयारी केली जात आहे. त्यातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची त्यांच्या निवासस्थानी ‘शिवतीर्थ’वर भेट घेतली. या भेटीनंतर राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) यांना राज्यपाल नामनियुक्त आमदार म्हणून विधानपरिषदेवर पाठवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता यावरून काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी भाजपवर निशाणा साधलाय.
अमित ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक माहीम विधानसभा मतदारसंघातून लढवली होती. माहीममध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. माहीमची निवडणूक तिरंगी झाली होती. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे महेश सावंत यांनी सदा सरवणकर आणि अमित ठाकरे यांचा पराभव केला होता. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला यंदाच्या विधानसभा निवडणुकीत एकही जागा जिंकता आली नाही. यानंतर आगामी महापालिकेच्या निवडणुकीत भाजप मनसेची साथ घेणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यातच देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. या भेटीनंतर अमित ठाकरे यांना भाजपच्या कोट्यातून विधानपरिषदेवर पाठवण्याची शक्यता आहे.
भाजप ने केला की योग्य निर्णय
— Atul Londhe Patil (INDIA Ka Parivar)🇮🇳 (@atullondhe) February 10, 2025
इतरांनी केला की परिवारवाद
ऐसे कैसे चलेगा !
वृत्तवाहिन्यांवरील बातम्यांनुसार भाजप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांना राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर घेणार आहे.
यात भाजपला परिवारवाद दिसत नाही.
भाजपची सगळी ध्येय धोरणे आणि…
अतुल लोंढेंचा भाजपला सवाल
यावर काँग्रेसचे अतुल लोंढे यांनी 'एक्स'वरून भाजपवर निशाणा साधलाय. ते म्हणाले की, भाजप ने केला की योग्य निर्णय, इतरांनी केला की परिवारवाद. ऐसे कैसे चलेगा! वृत्तवाहिन्यांवरील बातम्यांनुसार भाजप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांना राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर घेणार आहे. यात भाजपला परिवारवाद दिसत नाही. भाजपची सगळी ध्येय धोरणे आणि मुद्दे ही सोयीप्रमाणे असतात, असा हल्लाबोल अतुल लोंढे यांनी केलाय. आता अतुल लोंढे यांच्या टीकेनंतर भाजप काय प्रत्युत्तर देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
