एक्स्प्लोर

Prashna Maharashtrache : गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड देणार राज्यातील महत्त्वाच्या प्रश्नांना उत्तरं

Prashna Maharashtrache : Maharashtra Minister Jitendra Awhad : एबीपी माझावर 'प्रश्न महाराष्ट्राचे' हा विशेष कार्यक्रम घेतला जात आहे. यात राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याशी संवाद साधला आहे.

LIVE

Key Events
Prashna Maharashtrache : गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड देणार राज्यातील महत्त्वाच्या प्रश्नांना उत्तरं

Background

Prashna Maharashtrache : Maharashtra Minister Jitendra Awhad : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार (Maha Vikas Aghadi) येऊन जवळपास अडीच वर्ष पूर्ण झाली आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वातील हे सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक घोषणा केल्या. सोबतच विकासकामांचे दावे देखील करण्यात आले. परंतु, सामान्य माणसांचे प्रश्न कुठेतरी मागे राहिल्याचं चित्र आहे. महागाई, रोजगार, शेतीसमोरील आव्हानं, उद्योगातील समस्या असे अनेक सवाल सामान्य माणसांसमोर उभे ठाकले आहेत. याच निमित्ताने आज एबीपी माझाने 'प्रश्न महाराष्ट्राचे' हा कार्यक्रम आयोजित केला. यात मुंबई, विदर्भ, मराठवाडा, कोकण, उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्र अशा सर्व भागांतून सामान्य नागरिकांचे सवाल उत्तरदायी असलेल्या नेत्यांना आणि मंत्र्यांना विचारण्यात येणार आहेत. 

राज्यातील दिग्गज नेते आणि मंत्र्यांचा सहभाग

या कार्यक्रमात सकाळी 10 वाजता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील सहभाग घेतला. त्यांच्याशी कायदा सुव्यवस्था विषयावर संवाद होणार आहे. तर 11 वाजता शालेय शिक्षण व्यवस्थेवर राज्यमंत्री बच्चू कडू हे सहभाग झाले होते. 12 वाजता कृषीसंदर्भातील प्रश्नांवर राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांच्याशी संवाद साधण्यात आला.

दुपारी एक वाजता भाजप नेते आमदार आशिष शेलार यांच्याशी संवाद साधला. तर दुपारी 2 वाजता मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याशी गृहनिर्माण संबंधी प्रश्नावर चर्चा होणार आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ दुपारी तीन वाजता या कार्यक्रमात भाग घेतील तर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हे सायंकाळी 4 वाजता प्रश्नांची उत्तरं देतील. 

भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील 4.30 वाजता या कार्यक्रमात सहभागी होतील तर महसूल संबंधी प्रश्नांवर बोलण्यासाठी मंत्री  बाळासाहेब थोरात हे 5 वाजता कार्यक्रमात सहभागी होतील.

कुठे पाहाल कार्यक्रम?

हा सर्व कार्यक्रम आपण आज दिवसभर एबीपी माझा चॅनलवर पाहू शकणार आहोत. तसेच एबीपी माझाच्या यू ट्यूब चॅनेलवर दिवसभर या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण होईल. सोबतच एबीपी माझाच्या वेबसाईट, फेसबुक, ट्विटरवरही कार्यक्रमाचे अपडेट्स आपल्याला पाहायला मिळणार आहेत.

14:49 PM (IST)  •  27 May 2022

Prashna Maharashtrache : धारावीचा प्रश्न गुंतागुंतीचा झाला आहे. धारावी विकसित केलं तर दुसरं बीकेसी उभं राहिल : जितेंद्र आव्हाड  

Prashna Maharashtrache : धारावीचा प्रश्न गुंतागुंतीचा झाला आहे. धारावी विकसित केलं तर दुसरं बीकेसी उभं राहिल : जितेंद्र आव्हाड  

14:38 PM (IST)  •  27 May 2022

Prashna Maharashtrache : पोलिसांना फुकटात घर देणं अव्यवहारिक : जितेंद्र आव्हाड  

Prashna Maharashtrache : पोलिसांच्या क्वॉर्टर्स या क्वॉर्टर्स राहिल्या पाहिजे. पोलिसांना क्वॉर्टर्स द्या पण फुकटात घर नको. पोलिसांना फुकटात घर देणं अव्यवहारिक : जितेंद्र आव्हाड  

14:26 PM (IST)  •  27 May 2022

Prashna Maharashtrache : कोरोना महामारीच्या दोन वर्षांच्या काळातही मुंबई घरांची विक्री जास्त : जितेंद्र आव्हाड

Prashna Maharashtrache : कोरोना महामारीच्या दोन वर्षांच्या काळातही मुंबई घरांची विक्री जास्त झाली, जी मागील दहा वर्षात झाली नव्हती : जितेंद्र आव्हाड

14:24 PM (IST)  •  27 May 2022

Prashna Maharashtrache : मुंबईला पुढे न्यायचं असेल तर मुंबई झोपडपट्टी मुक्त करावी लागेल : जितेंद्र आव्हाड

Prashna Maharashtrache :  मुंबईला पुढे न्यायचं असेल तर मुंबई झोपडपट्टी मुक्त करावी लागेल. सध्याची मुंबई ही रिडेव्हलपमेंटची आहे. : जितेंद्र आव्हाड

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

1 Min 1 Constituency : 1 मिनिट 1 मतदारसंघ : 15 Nov 2024 : Vidhan Sabha : Maharashtra ElectionRaj Thackeray Bhiwandi : महिला कार्यकर्ता पाया पडली, राज ठाकरे म्हणले, हे नाही आवडत मलाNashik-BJP Sena Rada : भाजपच्या गणेश गीतेंच्या वाहनावर हल्ला,  नाशिकमध्ये भाजप-सेनेचा राडाShreya Yogesh Kadam Ratnagiri : 6 महिने मुलांपासून दूर; प्रचारादरम्यान योगेश कदमांच्या पत्नी भावूक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Nashik Election : प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
मोठी बातमी! भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
Embed widget